आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियांकाचा कथित बॉयफ्रेंड निकविषयी बोलली आई, पहिल्या भेटीनंतर अशी होती प्रतिक्रिया

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : प्रियांका चोप्रा आपला कथित बॉयफ्रेंड अमेरिकन सिंगर निक जोनाससोबत शुक्रवारी डिनर डेटवर गेली होती. यावेळी प्रियांकाची आई मधु चोप्राही सोबत होत्या. प्रियांका आणि निकच्या रिलेशनवर मधु चोप्रा म्हणाल्या की, आम्ही फक्त डिनरला गेलो होतो. तिथे निकही होता. तिथे जवळपास 10 लोक होते, निकसोबत बोलण्यासाठी ही जागा योग्य आहे असे मला वाटले नाही. असेही मी निकला पहिल्यांदाच भेटले, यामुळे त्याच्याविषयी मत तयार करणे योग्य नाही. विदेशीसोबत प्रियांकाचे लग्न नाही, असे बोलल्या होत्या मधु चोप्रा...

 

निक जोनासला भारतात आणल्यानंतर प्रियांका तिच्या सर्व जवळच्या लोकांसोबत त्याची भेट घालून देत आहे. परंतू एका मुलाकतीत मधु चोप्रा म्हणाल्या होत्या की, प्रियांकाची जोडी विदेशी व्यक्तीसोबत याची मी कल्पनाही करु शकत नाही. काही दिवसांपुर्वी आमच्या वेबसाइटने प्रियांच्या आई मधु चोप्रासोबत बातचित केली. तेव्हाही त्या म्हणाल्या की, मी या गोष्टीवर अजूनही कायम आहे. प्रियांकाची जोडी विदेशीसोबत याचा मी विचारही करु शकत नाही.

 

अनेक वेळा एकत्र दिसले आहे प्रियांका-निक
प्रियांका आणि निक हे आपल्या रिलेशनशीपविषयी बोललेले नाही. एका मुलाखतीत प्रियांकाला निकविषयी विचारण्यात आले होते. तेव्हा ती म्हणाली - अजून तरी वेळ मिळाला नाही, पुढच्या वेळी भेटला तर अवश्य फ्लर्ट करेल. परंतू दोघं अनेक वेळा एकत्र दिसतात, कार्यक्रमात एकत्र जातात. यावरुन अंदाज लावला जाऊ शकतो.


प्रियांकापेक्षा 10 वर्षे लहान आहे निक जोनास...
- प्रियांका चोप्रा 35 वर्षांची आहे, तर निक जोनस 25 वर्षांचा आहे. दोघांची पहिली भेट कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती. 'क्वांटिको' शोच्या दरम्यान ते भेटले होते. डेटिंगच्या वृत्तानंतर दोघांचे अनेक फोटोज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये प्रियांका आणि निक एकत्र क्वालिटी टाईम स्पेंड करताना दिसले आहेत. प्रियांका ही निकच्या बहीणीच्या लग्नासाठी अटलांटामध्ये गेली होती.

बातम्या आणखी आहेत...