आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'क्वांटिको\' च्या शूटिंग दरम्यान जखमी झाली प्रियांका चोप्रा, ट्वीटरवर दिली माहिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क : अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या 'क्वांटिको' च्या तिस-या भागाची शूटिंग करतेय. या शूटिंग दरम्यान ती जखमी झाली. तिच्या गुडघ्याला इजा झाली आहे. पुढील काही काळासाठी तिला आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. याविषयीची माहिती तिने स्वतः ट्वीटवर दिली आहे. ती म्हणाली की, "शूटिंग दरम्यान माझ्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. सेटवर माझ्यासोबत एक फिजियोलॉजिस्ट आहेत आणि माझ्या गुडघ्याची जखम पुढच्या तीन आठवड्यात ठिक होईल. एलेक्स पुन्हा क्वांटिकोमध्ये आली आहे."


- क्वाटिंको ही अमेरिकेतील एक मालिका आहे.  27 सप्टेंबर 2015 पासून एबीसी या वाहिनीवर ती प्रसारित होत आहे. या मालिकेमध्ये प्रियांकाने एलेक्स पेरिश ही व्यक्तिरेखा साकारली आहे. या मालिकेमध्ये प्रियांकासह यास्मिन अल मसरी, जेक मेकलौफलिन, औंजानु एल्लिस, जोश होपकिंस, जोहन्ना ब्रड्डी हे कलाकारही भूमिका करत आहेत.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा प्रियांकाचे ट्वीट...

बातम्या आणखी आहेत...