आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नीरज यांच्या आईवडील-पत्नीचे झाले होते निधन, या व्यक्तीने अखेरच्या श्वासापर्यंत केला सांभाळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निर्माता फिरोज नाडियाडवाला आणि नीरज वोरा - Divya Marathi
निर्माता फिरोज नाडियाडवाला आणि नीरज वोरा


विनोदी अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शक नीरज वोरा यांची आज (14 डिसेंबर) पहाटे चार वाजता प्राणज्योत मालवली.  मुंबईतील कृती केअर हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 54 वर्षांचे होते. मागील 13 महिन्यांपासून ते कोमात होते. अभिनेते परेश रावल यांनी ट्वीट करुन त्यांच्या निधनाचे वृत्त दिले. त्यांच्या निधनाने बॉलिवूडमधील हरहुन्नरी कलाकार हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.


नीरज वोरा यांच्या पश्च्यात कोणीही नव्हती... 
नीरज वोरा यांच्या कुटुंबात कुणीही नव्हते. त्यांचे वडील पंडीत विनायक राय वोरा यांचे 2005 मध्ये निधन झाले, तर 2014 मध्ये त्यांच्या आईचेही निधन झाले होते. नीरज यांच्या पत्नीचेही काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. त्यांना मुलबाळं झाले नाही. नीरज यांना एक भाऊ आहे. उत्तांक वोरा हे त्याचे नाव असून तो संगीतकार आहे. 


पुढे वाचा, प्रसिद्ध निर्माते फिरोज नाडियाडवाला यांनी केला अखेरच्या श्वासापर्यंत सांभाळ.. घरीच तयार केली होती आयसीयू रुम... 

बातम्या आणखी आहेत...