आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या अॅक्टरने जिच्यासाठी दिला होता सलमानच्या बहिणीला घटस्फोट, आता झाले ब्रेकअप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता सलमान खानची मानलेली बहीण श्वेता रोहिरा हिचा नवरा पुलकित सम्राटने ज्या अभिनेत्रीसाठी तिला सोडले होते, आता तो तिच्यापासून वेगळा झाला आहे. आम्ही बोलतोय ते यामी गौतम हिच्याविषयी. पुलकितने यामीसाठी श्वेताला घटस्फोट दिला होता. पण काही काळ एकमेकांना डेट केल्यानंतर आता पुलकित आणि यामी यांचे ब्रेकअप झाले आहे. पुलकितने अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत तो सिंगल असल्याचे सांगितले आहे. इतकेच नाही तर यामी आणि पुलकित यांनी सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केले आहे. 


विभक्त होण्यामागचे कारण गुलदस्त्यात... 
पुलकित आणि यामी यांचे वेगळे होण्याचे कारण अद्याप पुढे आलेले नाही. रिपोर्ट्सनुसार, यामीच्या आईवडिलांना पुलकित पसंत नाही. घटस्फोटित व्यक्तीला यामी डेट करत असल्याचे त्यांना पसंत नाही. यामीच्या आईने तिला पुलकितपासून वेगळे होण्याचे ताकिद दिली होती. 


पुढील स्लाईड्सवर वाचा, पुलकित, यामी आणि श्वेता यांच्याविषयी...  

बातम्या आणखी आहेत...