आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडाली ब्रदर्सपैकी एक तारा निखळला, प्रसिद्ध सुफी गायक प्यारेलाल वडाली यांचे निधन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रसिद्ध सुफी गायक आणि उस्ताद पुरणचंद वडाली यांचे धाकटे भाऊ प्यारेलाल वडाली यांचे शुक्रवारी निधन झाले आहे. अमृतसह येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. अमृतसर येथील फोर्टिस इस्कॉर्ट्स हॉस्पिटलमध्ये गुरुवारी त्यांना दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. 

 

उस्ताद पुरणचंद आणि उस्तार प्यारेलाल हे दोघे वडाली ब्रदर्स म्हणून प्रसिद्ध आहेत. सुफी संगीत जनमानसात पोहचवण्यात वडाली ब्रदर्स यांचे मोठे योगदान आहे. 


रंगरेज मेरे (तनू वेड्स मनू - 2011), इक तू ही तू ही (मौसम - 2011) ही त्यांची गाजलेली बॉलिवूड गाणी आहेत.

 

पुढे वाचा, गायिका रेखा भारद्वाज यांचे ट्वीट... 

बातम्या आणखी आहेत...