आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'रेस 3' मध्ये सलमान खानचे लग्जरी घर, समोर आले ऑन लोकेशन Photos

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : सलमान खानचा मोस्टअवेडेट चित्रपट 'रेस 3' यावर्षी शुक्रवारी म्हणजेच 15 जूनला रिलीज होतोय. जवळपास 150 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटात सलमान(सिकंदर) आणि अनिल कपूर(शमशेर) यांचे लॅविश घर दाखवण्यात आले आहेत. याचे काही फोटोज समोर आले आहेत. या लग्जरी घराचा सेट गोरेगांव येथील फिल्मसिटीमध्ये बनवण्यात आले आहे, याचे काही फोटोज समोर आले आहेत. हे पाहून अंदाज लावला जाऊ शकतो की, घराचा सेट बनवण्यासाठी खुप खर्च आला असेल. चित्रपटातील 'अल्ला दुहाई है' हे गाणेही येथेच शूट करण्यात आले होते. 


स्टंटमध्ये चालवल्या 10 कोटींच्या कार...
रेमो डिसूजाच्या डायरेक्शनमध्ये तयार झालेल्या या चित्रपटात अनेक स्टंट आहेत. हे चित्रित करण्यासाठी हेलिकॉप्टर, मोटर बोट आणि अनेक ब्रान्डेड लग्जरी कारचा वापर करण्यात आला आहे. चित्रपटाचे प्रोडक्शन डिझायनर रजनीश हेडाई यांच्यानुसार, 'स्टंट सीन्स चित्रित करण्यासाठी आम्ही 10 कोटींच्या लग्जरी कार बोलावल्या होत्या. यामध्ये बुगाटी, लँम्बोर्गिनी, फरारी, लँड क्रूजर, रॉल्स रॉयस आणि मसेराटीसारख्या ब्रांडेड गाड्यांचा समावेश होता.'


अबु धाबी, थायलँड आणि मुंबईत होणार शूटिंग
हेडाऊनुसार, हा चित्रपट अबुधाबी व्यतिरिक्त थायलँड आणि मुंबईच्या लोकेशन्सवर शूट केला गेला. बँकॉकजवळ कंचनाबुरीमध्ये पाणी, जंगल आणि हवेत अनेक सीन चित्रित करण्यात आले आहेत.

 

जेट सूटमध्ये सलमानवर चित्रित करण्यात आला सीन
अबु धाबीमध्ये सलमानवर एक स्टंट चित्रित करण्यात आला आहे. यामध्ये तो जेट कॉस्ट्यूम घालून उंचीवरुन उडी मारताना दिसतोय. हा एक आउटफिट होता, यामध्ये जेट इंजिनसोबत विंग्स होते. हे उडण्यात मदत करतात. यासोबतच शूटिंगमध्ये ब्रिटिश काळातील आर्मी वाहन, जीप आणि बाइक्सचा वापर करण्यात आला आहे.
 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा 'रेस 3' चित्रपटाच्या सेटचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...