आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

RACE 3 First Review: क्रिटिक्स म्हणाले पैसा वसूल चित्रपट, मिळाले 4 स्टार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : सलमान खान आणि त्यांच्या गँगचा रेस-3 चित्रपट आज चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. काल चित्रपट प्रदर्शित झाला. तेव्हाच या चित्रपटावर प्रतिक्रिया येत होत्या. आपण या चित्रपटाच्या प्रोमोतच पाहिले की, हा चित्रपट फुल ऑन बॉलिवूड मसाला आहे. यामध्ये अॅक्शन, डान्स, रोमान्स, थ्रिल सर्व काही आहे.

 

पत्रकार उमैर संधूने पोस्ट केला पहिला रिव्ह्यू
प्रसिध्द पत्रकार उमैर संधूने आपल्या इंस्टाग्रामवर चित्रपटाचा पहिला रिव्ह्यू शेअर केला आहे. संधूनुसार हा चित्रपट योग्य प्रकारे बनवलेला एक मास एन्टटेनर चित्रपट आहे. संधूने ट्वीटमध्ये लिहिले आहे की, पावर पॅक्ड परफॉर्मेंस, टाइट स्टोरी आणि स्क्रीनप्ले आणि शानदार डायरेक्शन! ब्लॉकबस्टर! संधूने चित्रपटाला ब्लॉकबस्टर म्हणत चार स्टार दिले आहेत. 

 

शेवटपर्यंत प्रेक्षकांना बांधून ठेवतो चित्रपट
हा चित्रपट शेवटपर्यंत प्रेक्षकांना बांधून ठेवतो. परंतू चित्रपटाचा क्लायमॅक्स काय हे शेवटपर्यंत कळत नाही. चित्रपटाच्या इंटरवलपुर्वीही कथेमध्ये मोठा ट्वीस्ट आहे. सलमान खान आणि बॉबी देओलचा शर्टलेस सीन चित्रपटाचा हायलाइट आहे. जॅकलीन आणि डेजी चित्रपटात ग्लॅमरस दिसत आहेत. दोघींच्या भूमिका दमदार आहेत. बॉबीच्या कमबॅक विषयी बोलायचे झाले तर त्याने कमबॅकसाठी प्राण ओतला आहे. चित्रपटातील अभियन आणि त्याच्या फिटनेसवरुन त्याची मेहनत स्पष्ट दिसत आहे. 

बातम्या आणखी आहेत...