आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुटूंबापासून लपून वर्कआउट करायचा सलमान, पाहणा-याला द्यायचा 100 रुपयांची लाच

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : सलमान खानचा 'रेस 3' आज चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. चित्रपटामध्ये पुन्हा एकदा सलमानचा शर्टलेस अवतार पाहायला मिळतोय. चित्रपटात शर्टलेस होणे आणि तरुणांना फिट बॉडी बनवण्यासाठी इंस्पायर करण्याचे क्रेडिट सलमान खानला जाते. 20 वर्षांपुर्वी म्हणजेच 1998 मध्ये आलेल्या 'प्यार किया तो डरना क्या' चित्रपटातील 'ओ ओ जाने जाना' चित्रपटात सलमान खान पहिल्यांदा शर्टलेस दिसला होता. परंतू सलमान चित्रपटांमध्ये येण्यापुर्वीपासूनच फिटनेस फ्रिक आहे. 

 

एकेकाळी कुटूंबापासून लपून करायचा वर्कआउट
- एकेकाळी सलमान कुटूंबापासून लपून वर्कआउट करायचा. या गोष्टीचा खुलासा जसीम खानचे पुस्तक 'बीइंग सलमान' मध्ये केला आहे. त्याने या गोष्टी कुटूंबापासून लपवल्या कारण, ते फिटनेसविषयी एवढे एक्सायटेड नव्हते. या पुस्तकात लिहिले आहे की, खान कुटूंबाच्या परिचित व्यक्तीने जर सलमानला वर्कआउट करताना पाहिले तर तो त्यांना 100 रुपयांची लाच द्यायचा. कारण त्याने कुटूंबाच्या व्यक्तीला याविषयी सांगू नये. मोहनीश बहल यांचा दाखला देऊन पुस्तकात हा खुलासा केला आहे.

 

जिममध्ये झाली मोहनीशसोबत मैत्री
- सलमान खान आणि मोहनीश बहल चांगले मित्र आहेत. दोघांनी 'मैंने प्यार किया', 'हम आपके हैं कौन' पासून 'जय हो' पर्यंत अनेक चित्रपट एकत्र केले. परंतू खुप कमी लोकांना माहिती असेल की यांची मैत्री जिममध्ये झाली होती. चित्रपटांमध्ये येण्यापुर्वी सलमान मुंबईच्या सी रॉक हॉटेलच्या जिममध्ये वर्कआउट करायचा. मोहनीश बहलसोबत त्याची मैत्री झाली होती. मोहनीशनुसार, सलमानने त्याच्यासमोर चित्रपटाचा हिरो बनण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा मोहनीश सलमानला म्हणाला होता की, अॅक्टर बनणे एवढे सोपे नसते. परंतू तेव्हा मोहनीशला माहिती नसेल की, सलमान एक दिवस सुपरस्टार बनेल.
 

 

बातम्या आणखी आहेत...