आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Raj Babbar Was Nervous During The Forcing Scene With Zeenat Aman 'इंसाफ का तराजू'च्या रेप सीनच्या शूटिंगवेळी नर्व्हस होते राज बब्बर, या अॅक्ट्रेसने करायला लावली होती रिहर्सल

'इंसाफ का तराजू'च्या रेप सीनच्या शूटिंगवेळी नर्व्हस होते राज बब्बर, या अॅक्ट्रेसने करायला लावली होती रिहर्सल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अभिनेते राज बब्बर आज त्यांचा 66 वा वाढदिवस सेलिब्रेट करत आहेत. त्यांचा जन्म 23 जून 1952 रोजी टुंडला, उत्तरप्रदेश येथे झाला. 80 च्या दशकात 'इंसाफ का तराजू' या चित्रपटात त्यांना अभिनेत्री झीनत अमानसोबत रेप सीन शूट करायचा होता. या सीनमुळे राज बब्बर फार घाबरले होते. झीनत अमान या त्याकाळच्या लोकप्रिय अभिनेत्रीसोबत असा शूट करायचा असल्याने त्यांना दडपण आले होते.


राज बब्बर यांनी त्यांच्या करिअर काळात अनेक हिट चित्रपट दिले आहेत. पण करिअरच्या सुरुवातीच्या काळात असा सीन शूट करण्यासाठी राज बब्बर फार घाबरले होते. शूटवेळी ते घामाघूम झाले होते.
 

निगेटीव इमेज बनेल अशी होती भीती..
1980 मध्ये राज बब्बर यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यांनी त्यावेळी 'आप तो ऐसे न थे', 'जज्बात', 'सौ दिन सास के' यांसारख्या चित्रपटात काम केले. यादरम्यान त्यांना इंसाफ का तराजू या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. यात त्यांना झीनत अमानसोबत रेप सीन शूट करायचा होता. त्यांना वाटले करिअरच्या पदार्पणातच अशाप्रकारचा रोल केला तर इमेज खराब होईल. स्वतःची इमेज वाचवण्यासाठी त्यांनी बी. आर. चोप्रा यांच्यासोबत चर्चा केली. त्यांनी दिग्दर्शकाला सांगितले की, हा सीन असा शूट करावा ज्यामुळे तो जास्त वाईट दिसणार नाही आणि त्यांनी असे केलेसुद्धा.  राज बब्बर यांना या सीनदरम्यान त्यांना जितके क्रुर बनता येईल तितके बनण्यासाठी सांगण्यात आले. 


शूट करताना घाबरले होते राज बब्बर..
झीनत अमान यांनी राज बब्बर यांना सीन नीट समजावला आणि त्यांना घाबरुन जाण्याचे कारण नाही असे सांगितले. जेव्हा सीन सुरु होणार होता तेव्हा राज बब्बर यांनी झीनतला खूप मारले, इकडे तिकडे फेकले पण झीनत यांनी चिकार शब्दही काढला नाही. झीनत यांच्यातील प्रोफेश्नलिजम पाहून राज खूप प्रभावित झाले होते. 


या चित्रपटात केले आहे काम..
राज बब्बर यांनी 'कलयुग' (1981), 'राज' (1981), 'प्रेम गीत' (1981), 'दुल्हा बिकता है' (1982), 'भिगी पलकें' (1982), 'माटी मांगे खून' (1984), 'एतबार' (1985), 'संसार' (1987), 'जख्मी औरत' (1988), 'खिलाड़ी 786' (2012), 'तेवर' (2015) यांसारख्या अनेक चित्रपटात काम केले आहे. 

बातम्या आणखी आहेत...