आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'Day: मुलाखतीसाठी आलेल्या तरुणीवर जडला होता रजनीचा जीव, तिरुपतीला केले लग्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऐश्वर्या आणि सौंदर्या या दोन्ही मुलींसोबत रजनीकांत. - Divya Marathi
ऐश्वर्या आणि सौंदर्या या दोन्ही मुलींसोबत रजनीकांत.

साऊथचे सुपरस्टार रजनीकांत आज त्यांचा 67वा वाढदिवस साजरा करत आहेत. रजनीकांत यांचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड आहे. 12 डिसेंबर 1950 ला बंगळुरुतील एका मराठी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. वडिलांचे नाव रामोजीराव गायकवाड तर आई जिजाबाई गायकवाड. 

 

रजनीकांत यांनी 26 फेब्रुवारी 1981 ला लता रंगाचारी यांच्यासोबत विवाह केला. लता या विद्यार्थिनी असताना कॉलेजच्या मॅगझिनसाठी त्यांना रजनीकांत यांची मुलाखत घ्यायही होती. रजनीकांत यांच्या मुलाखतीसाठी गेलेल्या लता यांच्या पहिल्या भेटीतच साऊथचा हा सुपरस्टार या तरुणीवर फिदा झाला होता.  त्यानंतर दोघांनी आंध्रप्रदेशातील तिरुपती येथे लग्न केले. 

लता या गायिका असून त्यांनी बॉलिवूडमध्ये काही गाणीही गायली आहेत. आता त्या रजनीकांत यांच्या सामाजिक उपक्रमाची कामे पाहातात. या जोडप्याला दोन मुली आहेत. ऐश्वर्या आणि सौंदर्या. 

 

पुढील स्लाइडमध्ये इन्फोग्राफिक्समध्ये जाणून घ्या रजनी-लता यांची LoveStory... 

बातम्या आणखी आहेत...