आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

7 वर्षांच्या मुलाचा प्रामाणिकपणा पाहून भावुक झाले रजनीकांत, उचणार त्याच्या शिक्षणाचा खर्च

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : साउथ सुपरस्टार रजनीकांत सध्या 7 वर्षांच्या मुलासोबत भेट घेतल्यामुळे चर्चेत आहे. या 7 वर्षीय मुलाचे नाव मोहम्मद यासिन आहे आणि तो त्यांचा मोठा फॅन आहे. विशेष म्हणजे या मुलाचा प्रामाणिकपणा पाहून रजनीकांत यांनी त्यांची भेट घेतली. मोहम्मदला 50,000 रु. असलेली पर्स मिळाली होती. ही पर्स त्याने परत केली आणि चर्चेत आला. रजनीकांत हेसुध्दा या मुलाचा प्रामाणिकपणा पाहून त्याच्यावर इम्प्रेस झाले. 


मुलाची कथा ऐकून त्याला भेटण्यास तयार झाले रजनीकांत
- काही दिवसांपुर्वी इयत्ता दुसरीमध्ये शिकणारा मोहम्मद शाळेत जात होता. रस्त्यात त्याला एक पर्स मिळाली. यामध्ये 50,000 रु.  होते.
- मोहम्मदने पैशांची लालसा न बाळगता ही पर्स प्रिंसिपलला दिली आणि म्हणाला की, हे माझे पैसे नाही. प्रिंसिपलने पोलिसांना याची माहिती दिली आणि हे पर्स आणि पैसे त्याच्या योग्य मालकाला दिले.
- मोहम्मदला त्याच्या प्रामाणिकपणाचे बक्षिस देण्यासाठी त्याला काय हवे आहे ते विचारण्यात आले. यावेळी तो म्हणाला की, मला रजनीकांत यांना भेटायचे आहे. रजनीकांत यांना याविषयाची माहिती मिळताच त्यांनी मुलाला भेटण्यास होकार दर्शवला. 
रजनीकांत उचलणार मोहम्मदच्या हायर एज्यूकेशनचा खर्च
- रजनीकांत मोहम्मदचा प्रामाणिकपणा पाहून प्रेरित झाले. त्यांनी मुलाला आपल्या घरी सहकुटूंब आमंत्रित केले. 
- मोहम्मदसोबतच त्याचे कुटूंब रजनीकांत यांना भेटले. मीडियासोबत रजनीकांत म्हणाले की, "आजच्या काळात लोक थोडाशा पैशांसाठी लोकांची फसवणू करतात. लोक एकमेकांचा जीवही घेतात. असा वेळी मोहम्मत समाजासाठी एक उदाहरण आहे."
- मोहम्मदचा प्रामाणिकपणा पाहून रजनीकांतने या मुलाच्या उच्च शिक्षणाची जबाबदारी निभावण्याचे वचन दिले आहे. 
 

 

 

बातम्या आणखी आहेत...