आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रजनीकांत-अक्षय कुमारच्‍या \'2.0\' सिनेमाच्‍या रिलीजची घोषणा, यांच्‍या वाढू शकतात अडचणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- अखेर मंगळवारी रात्री रजनीकांत आणि अक्षय कुमारचा बहुप्रतिक्षित चित्रपट '2.0' च्‍या रिलीजची घोषणा करण्‍यात आली. हा देशातील आतापर्यंतचा सर्वात महागडा चित्रपट असल्‍याचे सांगितले जात आहे. 29 नोव्‍हेंबर रोजी देशातील सर्व सिनेमागृहांत तो एकाचवेळी प्रदर्शित करण्‍यात येणार आहे. मागील दोन वर्षांपासून रजनीकांत व अक्षय कुमारचे फॅन्‍स या सिनेमाची वाट पाहत आहेत.  


मात्र या घोषणेमुळे अभिषेक कपूर दिग्‍दर्शित 'केदारनाथ' सिनेमासमोरील अडचणी वाढणार आहे. या सिनेमात सुशांत सिंह राजपूत आणि सैफ अली खानची मुलगी सारा अली खान मुख्‍य भुमिकेत आाहेत. 30 नोव्‍हेंबरोजी हा सिनेमा रिलीज करण्‍याची घोषणा करण्‍यात आली आहे. मात्र '2.0'च्‍या घोषणेमुळे केदारनाथची रिलीज डेट बदलण्‍याची शक्‍यता वर्तविली जात आहे. कारण तसे न झाल्यास या सिनेमाला रजनीकांत आणि अक्षय कुमारच्‍या तगड्या सिनेमाशी सामना करावा लागणार आहे. 

 

'2.0' वर जवळपास 500 कोटींचा खर्च 

'2.0' सिनेमावर जवळपास 500 कोटींचा खर्च आतापर्यंत करण्‍यात आला आहे. त्‍यामुळे पुर्ण किंमत वसूल करण्‍यासाठी ही रिलीज डेट अत्‍यंत उपयुक्‍त असल्‍याचे जाणकारांचे म्‍हणणे आहे. कारण या तारखेच्‍या आसपास कोणताही बिग बजेट सिनेमा प्रदर्शित होणार नाहीए. सांगण्‍यात येते की, या सिनेमातील  स्‍पेशल इफेक्‍ट्ससाठी सिनेमावर अतिरिक्‍त 100 कोटी खर्च करण्‍यात आला. रजनीकांत आणि ऐश्‍वर्या रॉय बच्‍चन स्‍टारर रोबोट या सिनेमाचा हा सिक्‍वल आहे. यामध्‍ये अॅमी जॅक्‍सन फीमेल लीडमध्‍ये आहे तर अक्षय कुमार हे डॉक्‍टर रिचर्डचा रोल करत आहे. विचित्र अशा राक्षसी कावळ्यासारखा त्‍याचा गेटअप आहे. 

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, या सिनेमाचे रिलीज करण्‍यात आलेले काही पोस्‍टर्स... 

 

बातम्या आणखी आहेत...