आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
एन्टटेन्मेंट डेस्क : दिग्दर्शक राजकुमार हिरानीने दत्त बायोपिकच्या टीजरची घोषणा केली आहे. रणबीर कपूर या चित्रपटात अभिनय करत आहेत. संजय दत्तरच्या आयुष्यावर आधारित हा 'दत्त बायोपिक' चा टीजर आणि चित्रपटाचे टायटल 24 एप्रिलला रिलीज केले जाणार आहे. जादू की झप्पी देऊन सर्वांची मन जिंकणारा अभिनेता संजय दत्तचे आयुष्य रोमांचने भरपूर आहे. आता या आयुष्याचे पैलू लवकरच मोठ्या पडद्यावर उलगडणार आहेत.
दिग्दर्शक राजकुमार हिरानीने ट्विटवर टीजरची घोषणा करत लिहिले, "A film very dear to me. Unveiling the teaser and title of #DuttBiopic on 24th April . Hope you like it @duttsanjay #Ranbirkapoor @AnushkaSharma @sonamakapoor @deespeak @SirPareshRawal @bomanirani @vickykaushal09 @KARISHMAK_TANNA @mkoirala @jimSarbh @foxstarhindi @VVCFilms @TSeries
चित्रपटात संजय दत्तच्या भूमिकेत रणबीर कपूर दिसणार आहे. त्याने चित्रपटासाठी खास मेहनत केली आहे. राजकुमार हिरानीने संजय दत्तच्या आयुष्याचा प्रत्येक पैलू उलगडण्याचा प्रयत्न केला आहे. राजकुमार हिरानी हे विशेषतः मुन्ना भाई, थ्री इडियट्स आणि पीकेसारखे मनोरंजक चित्रपटांसाठी ओळखले जातात.
संजय दत्त बायोपिक चर्चेचा विषय बनला आहे. कारण प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यासाठी खुप उत्सुक आहेत. रणबीर कपूर, मनीषा कोइराला, परेश रावल, अनुष्का शर्मा, दीया मिर्जा आणि सोनम कपूरसारख्या कलाकारांसोबतच हा चित्रपट तयार होतोय. या चित्रपटाचे प्रोड्यूसर चोप्रा फिल्म्स, राजकुमार हिरानी फिल्म्स आणि फॉक्स स्टार स्टूडिओ आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा रणबीर कपूरचे या चित्रपटाचे काही लूक...
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.