आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bad News : ऑस्करच्या फॉरेन लँग्वेज कॅटेगरीतून बाहेर पडला राजकुमार रावचा 'न्यूटन'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मनोरंजन विश्वातला अत्यंत प्रतिष्ठेचा आणि सर्वात मोठा पुरस्कार सोहळा म्हणजे ऑस्कर. याच ऑस्कर पुरस्कारांच्या शर्यतीत भारतातर्फे मराठमोळ्या दिग्दर्शक अमित मसुरकरचा 'न्यूटन' हा सिनेमा सहभागी झाला होता. ऑस्करच्या फॉरेन लँग्वेज कॅटेगरीत न्यूटनला नामांकन मिळाले होते. पण आता हा चित्रपट या शर्यतीतून बाहेर पडला आहे. ऑस्करच्या ट्विटर हँडलवर जाहिर करण्यात आलेल्या 9 चित्रपटांच्या यादीत न्यूटनचा उल्लेख नाहीये. या यादीत  'अ फॅनटॅस्टिक वुमन', 'इन द फेड', 'ऑन बॉडी ऐंड सोल', 'फॉक्सट्राट', 'दि इनसल्ट' , 'लवलेस', 'द वुंड', 'फेलिसिटे', 'द स्क्वायर' या चित्रपटांना स्थान मिळाले आहे.

 

'द अकॅडमी'च्या ट्विटर हँडलवर असलेल्या ट्वीटमध्ये लिहिण्यात आले, '#Oscars90 news: फॉरेन लँग्वेज फिल्म अवॉर्डच्या यादीत नऊ चित्रपटांचा उल्लेख आहे. यापैकी तुम्ही किती पाहिलेत?'


भारतातर्फे 26 चित्रपटांमधून झाली होती 'न्यूटन'ची निवड  
फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या निवड समितीने 26 चित्रपटांमधून 'न्यूटन'ला ऑस्करसाठी पाठवण्याचा निर्णय घेतला होता. राजकुमार राव या चित्रपटात मुख्य भूमिकेत असून मराठमोळ्या अमित मसुरकरने याचे दिग्दर्शन केले आहे. छत्तीसगडच्या नक्षलवादी परिसरात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याची ही कहाणी असून, यात राजकीय परिस्थितीवर भाष्य करण्यात आले आहे. राजकुमारने यात न्यूटन कुमारची भूमिका साकारली आहे. राजकुमारशिवाय पंकज त्रिपाठी, संजय मिश्रा, अंजली पाटील, रघुबीर यादव यांच्याही मुख्य भूमिका आहेत.

बातम्या आणखी आहेत...