Home »News» Rakhi Sawant Ex-Boyfriend Abhishek Awasthi Is Getting Married In February 2018

तिसऱ्या गर्लफ्रेंडसोबत लग्न करणार राखी सावंतचा Ex बॉयफ्रेंड,एकदा तुटला होता विवाह, 3 वर्षे होते अफेअर

दिव्य मराठी वेब टीम | Jan 10, 2018, 10:55 AM IST

मुंबई - राखी सावंतचा एक्स बॉयफ्रेंड अभिषेक अवस्थी पुन्हा एकदा त्याच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. असे वृत्त आहे की, अभिषेक 2018 साली लग्न करणार आहे. नुकतेच त्याने इंस्टाग्रामवर होणारी पत्नी अंकिता गोस्वामीसोबत फोटो पोस्ट केले आहेत. यात त्याने त्याच्या लग्नाची बातमी दिली आहे.फेब्रुवारी 2018 मध्ये आहे लग्न...

- नुकतेच अभिषेकने त्याच्या साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत ज्यात तो एंगेजमेंट रिंग दाखवताना दिसत आहे.
- फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहीले आहे की, 25 दिवसांनंतर म्हणजेच 2 फेब्रुवारी 2018 ला तो लग्न करत आहे.
- दोघे एकमेकांना जवळपास दोन वर्षापासून डेट करत आहेत.

3 वर्ष होते राखी सावंतसोबत अफेअर...
- अभिषेक आणि राखी यांचे जवळपास 3 वर्ष अफेअर होते. ज्यानंतर त्यांचे ब्रेकअप झाले.
- मिळालेल्या माहितीनुसार, राखीने त्याला सर्व मीडियासमोर कानाखाली लावली होती त्यानंतर हे दोघे वेगळे झाले होते.
- रिलेशनशीपमध्ये असतानास त्यांनी 'नच बलिए-3'मध्ये सहभागही घेतला होता.
- अभिषेक आणि राखी फायनलिस्टही होते.
- अभिषेकने एका मुलाखतीत त्याच्या आणि राखीसोबतचे अफेअर शेमफुल पास्ट असे सांगितले. तिच्यासोबत जोपण वेळ घालवला त्याबद्दल त्याला पस्तावा होतो असे तो म्हणाला होता.

एकदा तुटले आहे लग्न..
- अभिषेकचे याअगोदर अंकिता सोनावणे या मुलीसोबत लग्न ठरले होते. या दोघांनी एंगेजमेंटही केली पण काही कारणाने हे लग्न होऊ शकले नाही.
- अभिषेकला शेवटी खिचडी या मालिकेत पाहिले गेले होते.

पुढच्या स्लाईडवर पाहा, अभिषेक अवस्थी आणि अंकिताच्या साखरपुड्याचे खास PHOTOS...

Next Article

Recommended