आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोल्डनेस सोडून कॉन्ट्रव्हर्शियल क्विन राखी सावंत झाली \'पंजाबी कुडी\', असा बदलला अवतार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राखी सावंत. - Divya Marathi
राखी सावंत.

मुंबई - राखी सावंत तिच्या बोल्ड लूक आणि वीयर्ड ड्रेसिंगमुळे नेहमीच चर्चेत राहाते. सोशल मीडियावर राखीला तिच्या अनेक पोस्टमुळे ट्रोल देखील केले जाते. यावेळी मात्र राखी वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. राखीने तिचे ट्रान्सफॉर्मेशन करुन सर्वांना चकित केले आहे. कॉन्ट्रव्हर्शियल क्वीन म्हणून ओळखली जाणारी अॅक्ट्रेस यावेळी चक्क ट्रॅडिशनल ड्रेसमध्ये समोर आली आहे. लाल रंगाच्या पटियाला सूटमध्ये तिने मॅचिंग ज्वेलरी घातलेली दिसते. या ड्रेसमध्ये राखी एक 'पंजाबी कुडी'च दिसत आहे. 

 

या इव्हेंटमध्ये प्रियंका चोप्राची आई मधु चोप्राही उपस्थित होती. राखी मधु चोप्रा यांनाही भेटली आणि त्यांच्यासोबत फोटोही घेतले. यावेळी राखीसोबत तिची आई देखील होती. 
- काही दिवसांपूर्वी राखी सावंतने बलात्काराच्या आरोपात तुरुंगात कैद गुरमीत राम रहिम आणि त्याची दत्तक मुलगी हनीप्रीतवर काही गंभीर आरोपही केले होते. यामुळे हनीप्रीतच्या आईने राखीला लीगल नोटीस बजावली होती. 
- राखी सावंत लवकरच एका बायोपिकमध्ये दिसणार आहे. यामध्ये ती डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहिमच्या दत्तक मुलीच्या भूमिकेत आहे. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा राखीचे काही फोटोज... 

बातम्या आणखी आहेत...