आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

RGV's Sanju: आता राम गोपाल वर्मा बनवणार संजय दत्तवर चित्रपट; बहिणींनी दिली अशी प्रतिक्रिया

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलीवुड डेस्क - राजकुमार हिरानी यांनी रणबीर कपूरसोबत साकारलेला Sanju चित्रपट सुपरहिट ठरला. संजय दत्तचे बायोपिक असलेल्या या मूव्हीने देशातच आतापर्यंत 325 कोटी रुपयांची कमाई केली. चित्रपटाची जेवढी सकारात्मक चर्चा झाली तेवढीच त्यावर टीका देखील करण्यात आली. हिरानी यांनी मुद्दाम संजय दत्तची प्रतिमा चमकवण्यासाठीच हा चित्रपट बनवला अशा प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या. अशीच काहीशी प्रतिक्रिया प्रसिद्ध अंडरवर्ल्डवर आधारित चित्रपटांसाठी ओळखले जाणारे दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनीही दिली. संजय दत्तवर आधारित असलेला चित्रपट 'संजू' मध्ये 1993 च्या बॉम्बस्फोटवर फारसे प्रकाश टाकण्यात आले नाही असे राम गोपाल वर्मा म्हणाले आहेत. त्यामुळेच, आता त्यांनी स्वतः संजू बाबावर चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला आहे. 


शीर्ष असेल 'संजू: द रिअल स्टोरी'
राम गोपाल वर्मा यांनी संजय दत्तसोबत चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्या मते, 93 च्या बॉम्बस्फोटाचा चित्रपटात फारसा उल्लेख करण्यात आलेला नाही. संजय दत्तच्या लाइफची आणखी काही पैलू Sanju या बायोपिकमध्ये नाहीत. त्यामुळेच, आता ते संजू बाबावर स्वतः चित्रपट तयार करणार आहेत. त्यांनी या चित्रपटाचे टायटल सुद्धा घोषित केले. 'संजू: द रिअल स्टोरी' या नावाने बनवल्या जाणाऱ्या चित्रपटात मुंबई बॉम्बस्फोटाला प्रकर्षाने दाखवले जाणार आहे. RGV यांच्या प्लॅनची माहिती संजय दत्तची बहिणी नम्रता पर्यंत पोहोचली. तिला हे वृत्त ऐकूण धक्का बसला आहे. 


आधी संजूची परवानगी घे रामू...
मिड डे शी संवाद साधताना नम्रता म्हणाली, रामगोपाल वर्माने यासाठी संजय दत्तची परवानगी घ्यायला नको का? संजयला यावर काही आक्षेप नसेल तर आम्ही काहीच बोलणार नाही. राम गोपाल वर्मा यांच्या कहाण्या खूपच डार्क असतात. अशात ते संजय दत्तच्या लाइफवर चित्रपट का बनवू इच्छित आहेत? ते आम्हाला पुन्हा वेदना देणार आहेत का? आम्ही संजू चित्रपटात संजय दत्तच्या लाइफचा प्रत्येक पैलू पाहिला आहे. संजयला जेव्हा अमली पदार्थांचे व्यसन लागले तेव्हा आम्ही त्याला रिहॅबला पाठवू शकलो. परंतु, जेव्हा तो तुरुंगात गेला तेव्हा आम्ही हतबल झालो. त्याला त्रास सहन करताना पाहण्याशिवाय आम्ही काहीच करू शकलो नाही. नम्रता संजय दत्तची बहिण आणि कुमार गौरवची पत्नी आहे. 

बातम्या आणखी आहेत...