आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3 गंभीर आजारांमुळे हाडाचा सापळा झाला होता हा अभिनेता, ओळखणेही झाले होते कठीण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अनेक बॉलिवूड आणि साऊथ चित्रपटांमध्ये व्हिलनची भूमिका साकारणारे अभिनेते रामी रेड्डी यांना त्यांच्या क्रूर भूमिकांसाठी ओळखले जाते. मग 1993 मध्ये आलेला चित्रपट 'वक्त हमारा है' मधील कर्नल चिकाराची भूमिका असो किंवा 'प्रतिबंध'मधील अण्णा. रामी व्हिलनच्या त्यांच्या प्रत्येक भूमिकेत प्राण ओतायचे. पण 250 पेक्षा जास्त चित्रपटांत काम करणारे रामी लिव्हरच्या आजाराने ग्रस्त झाले त्यामुळे ते कायम आजारी राहू लागले होते.


मरण्यापूर्वी हाडांचा सापळा बनले होते रामी
- लिव्हरच्या आजारामुळे रामी जास्तीत जास्त वेळ घरीच राहू लागले होते. हळू हळू ते सामाजिक कार्यक्रमांपासून दूर राहू लागले होते. एक दिवस एका इव्हेंटमध्ये ते दिसले, पण अनेकांना त्यांना ओळखताही आले नव्हते. 
- खरं तर रामी त्यावेळी अत्यंत सडपातळ दिसवे होते. त्यांना बघून हे एकेकाळचे प्रसिद्ध अभिनेते रामीच आहे, यावर कोणालाही विश्वास बसला नव्हता.
- लिव्हरनंतर रामी यांना किडनीच्या आजाराने घेरले. त्यामुळे मृत्यूपूर्वी ते हाडांचा सापळा बनले होता. त्यांना कॅन्सरही होता, असे म्हटले जाते. 
- काही महिने उपचार घेतल्यानंतर 14 एप्रिल 2011 रोजी वयाच्या 52 व्या वर्षी सिकंदराबादच्या एका खासगी रुग्णालयात रामी यांचा मृत्यू झाला होता.


पुढील स्लाइड्सवर वाचा, अॅक्टर बनण्यापूर्वी पत्रकार होते, रामी रेड्डी..

बातम्या आणखी आहेत...