Home | News | Ranbir Kapoor And Rajkumar Hirani Candid Moment: Sanju Star Fear To Father Rishi Kapoor But Mother His Blind

'Sanju'ची सर्व स्थरातून होतेय प्रशंसा, तरीही नर्वस आहेत राजू हिरानी, रणबीरला वाटतेय वडिलांची भिती

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jun 29, 2018, 12:29 PM IST

'पीके', 'थ्री इडियट्स' आणि 'मुन्नाभाई एमबीबीएस' सारखे सुपरहिट चित्रपट डायरेक्ट करणारे राजू हिरानी आजही आपला चित्रपट येण

  • Ranbir Kapoor And Rajkumar Hirani Candid Moment: Sanju Star Fear To Father Rishi Kapoor But Mother His Blind

    मुंबई : 'पीके', 'थ्री इडियट्स' आणि 'मुन्नाभाई एमबीबीएस' सारखे सुपरहिट चित्रपट डायरेक्ट करणारे राजू हिरानी आजही आपला चित्रपट येण्यापुर्वी नर्वस होतात. 'संजू' रिलीजपुर्वीही त्यांना असेच होतोय. तर दूसरीकडे 'संजू' मधील कामामुळे रणबीरची सर्व स्तरातून प्रशंसा होत आहे. तरीही त्याला वडील ऋषी कपूर यांची त्याच्या कामाविषयी काय प्रतिक्रिया असेल याची भिती वाटते. या दोन्ही गोष्टी त्यांनी स्वतः एका व्हिडिओत सांगितल्या आहेत. हा व्हिडिओ FoxStarHindi आणि Xiaomi ने शेअर केला आहे. या चित्रपटाची अॅडव्हान्स बूकिंगमधून चित्रपटाने 33 कोटींची कमाई केली आहे.


    व्हिडिओमध्ये रणबीर राजूला विचारतो की, तुमचा एखादा चित्रपट रिलीज होतो तेव्हा तुमच्या डोक्यात काय सुरु असते. राजू उत्तर देत सांगतात की, मी खुप नर्वस असतो... राजू यांनी सांगितले की, जेव्हा मी माझा पहिला चित्रपट मुन्नाभाई एमबीबीएस आपल्या आईला दाखवला होता तेव्हा तिने विचारले होते की, राजूच्या बायकोजवळ पक्की नोकरी आहे का?या बातचीतमध्ये रणबीर सांगता की, माझा वेक अप सिड चित्रपट आला होता. तेव्हा पापांचा मला फोन आहा. तेव्हा मी खुप घाबरलो होतो. शेवटी रणबीर राजूला विचारतो की, सर तुम्ही प्रत्येक अॅक्टरसोबत दोन चित्रपट केले आहे. माझा आत्ताशी एकच झाला आहे. मला लक्षात ठेवा. FoxStarHindi आणि Xiaomi नुसार या बातचितचा शेवटचा भाग चित्रपट रिलीज झाल्यानंतर प्रसारित करण्यात येणार आहे.

Trending