आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मुंबई : संजय दत्त यांच्या बायोपिकवर तयार झालेल्या 'संजू' चे टीजर मंगळवारी लॉन्च झाले. या लॉन्च इव्हेंटमध्ये रणबीर कपूर विशेष उपस्थित होता. तो या चित्रपटात संजय दत्तची भूमिका साकारत आहे. मीडियासोबत बोलताना रणबीर कपूर थोडा इमोशनल झाला. चित्रपटातील आपल्या भूमिकेविषयी रणबीर म्हणाला की, चित्रपटात संजयची नक्कल करणे त्यांचा अपमान करण्या सारखे आहे. यामुळे मी त्यांचा सन्मान करत त्यांची नक्कल केली नाही. ज्यावेळी राजू त्याच्याकडे चित्रपटाची स्क्रिप्ट घेऊन गेले तेव्हा तो स्क्रिप्ट पाहून कॉन्फिडेंट नव्हता. तो ही भूमिका साकारु शकेल की नाही अशी त्याला शंका होती. चित्रपटाच्या या इव्हेंटमध्ये राजकुमार हिरानी आणि प्रोड्यूसर विधू विनोद चोप्राही उपस्थित होते.
रणबीर म्हणाला - असे वाटले देवाने हा चित्रपट माझ्यासाठी पाठवला आहे
- लॉन्च इव्हेंटमध्ये मीडियासोबत बोलताना रणबीर म्हणाला, 'मी चित्रपट केला तेव्हा मला वाटले की, देवाने हा चित्रपट माझ्यासाठी पाठवला आहे.'
- रणबीरने सांगितले की, चित्रपटाची स्क्रिप्ट वाचून मी शॉक्ट होतो.
- रणबीर म्हणाला की, संजयने ड्रग्सचा सामना कसा केला असेल. त्यांच्या आयुष्यातील कॉन्ट्रोवर्सी, महिला, आईला गमावणे या सर्वांचा सामान त्यांनी कसा केला असेल हे मला स्क्रिनप्ले पाहिल्यानंतर कळाले.
- रणबीरने मीडियाच्या एका प्रश्नाचे उत्तर देताना सांगितले की, 'मी माझ्या चुकांमधूनच चांगले करणे शिकलो आहे. आयुष्य अवघड आहे परंतू अंत नाही.'
- रणबीर म्हणाला, 'चित्रपटात संजयप्रमाणे दिसण्यासाठी मी दिर्घकाळ वर्कआउट केला. यासाठी संजयने माझी खुप मदत केली.'
- 'मी संजयला नेहमी एक स्टाइल आयकॉन म्हणून पाहिले आहे. त्यांनी मला लहान भावाप्रमाणे ट्रीट केले.'
इव्हेंटमध्ये चित्रपटाचे डायरेक्टर राजकुमार हिरानी म्हणाले की, हा चित्रपट बनवणे आमच्यासाठी गरजेचे नव्हते. एक फिल्ममेकर म्हणून विचार केला तेव्हा वाटले की, चित्रपट बनवला जाऊ शकतो. याविषयावर संजयसोबत बोलल्यानंतर तो तात्काळ हो म्हणाला. संजयने चित्रपटासाठी आपल्या आयुष्यातील प्रत्येक पैलूवर मोकळ्यापणाने चर्चा केली. आमच्याजवळ 725 पेज स्क्रिप्ट होती. या मधून कोणचे सीन चित्रपटात घ्यायचे यावर आम्हाला निर्णय घ्यायचा होता.
लॉन्च इव्हेंटमध्ये विधु विनोद चोप्रा म्हणाले, 'मी संजयविषयी अनेक गोष्टी ऐकल्या आहेत. ते म्हणाले की, अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा संजयला मुन्नाभाईच्या नावाने ओळखतात यावर माझा विश्वास बसत नाही.'
पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा चित्रपटातील संजूचे लॉन्ट इव्हेंटचे फोटोज...
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.