आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Sanjuने अवघ्या 2 दिवसात कमावला 73 कोटींचा गल्ला, 3 दिवसात 100 कोटींचा आकडा करणार पार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क: बुहूप्रतिक्षीत आणि बहुचर्चीत 'संजू' हा चित्रपट शुक्रवारी रिलीज झाला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. 'संजू' हा चित्रपट यावर्षीचा रिलीजच्या पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. या चित्रपटाने सलमान खानच्या रेस 3चा रेकॉर्ड मोडीत काढत पहिल्या दिवशी भारतीय बॉक्स ऑफिसवर तब्बल 34.75 कोटींची कमाई केली. आता दूस-या दिवसापर्यंत या चित्रपटाने 73 कोटींचा गल्ला जमवला आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांच्या ट्वीटनुसार हा चित्रपट अवघ्या तीन दिवसात 100 कोटींचा आकडा ओंलांडणार असा अंदाज वर्तवला जातोय. हा राजू हिराणी आणि रणबीर कपूर यांच्या करिअरमधला पहिला सर्वाधिक ओपनिंग मिळवणारा चित्रपट ठरला आहे. यापूर्वी राजू हिराणींच्या 'पीके' या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी 26.63 कोटींची कमाई केली होती. तर रणबीरच्या करिअरमधील पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट 'बेशरम' हा होता. 'बेशरम'ची पहिल्या दिवसाची कमाई 21.56 कोटी इतकी होती.


या तीन गोष्टींमुळे संजू बनला सुपरहिट

तीन कारणांमुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. संजय दत्तची सुपरहिट कहाणी, दिग्दर्शक राज कुमार हिराणी आणि रणबीर कपूरचा दमदार अभिनय. देशातील 4000 स्क्रिन्सवर हा चित्रपट रिलीज झाला आहे. सोबतच 65 देशांतील 1300 स्क्रिन्सवर हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे. ट्रेड अॅनालिस्ट सुमित कादेल यांच्या मते हा एक ब्लॉकबस्टर चित्रपट आहे. मल्टिप्लेक्समध्ये या चित्रपटाविषयी बरीच चर्चा आहे. तर सिंगल स्क्रिन थिएटरमध्येही चित्रपटाची अॅडव्हान्स बुकिंग झाली आहे. अनेक ठिकाणी तर सकाळी सातचा शो लावण्यात आला आहे. सकाळच्या शोचे 60-70 टक्के बुकिंग झाले आहे. पहिला शो बघून बाहेर येणा-या लोकांनी चित्रपटाचे एवढे कौतुक केले की, संध्याकाळचे शोज हाऊसफूल झाले. 'संजू'ने पहिल्या दिवसाच्या कमाईत 'रेस -3'चा रेकॉर्ड तोडला आहे. कारण 'रेस -3'ने पहिल्या दिवशी 28.50 कोटींची कमाई केली होती. 

बातम्या आणखी आहेत...