आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'संजू'मध्ये रणबीरच्या अभिनयावर बोलला होता सलमान, आता मिळाले सडेतोड उत्तर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : रणबीर कपूर स्टारर 'संजू' चित्रपट आज चर्चेत आहे. चित्रपटात रणबीरने संजय दत्तची भूमिका साकारली आहे. काही दिवसांपुर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर आला. हा ट्रेलर सर्वांना पसंत पडत आहे. 'संजू' च्या ट्रेलरविषयी सलमान खानचे मत विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला की, हा संजय दत्तचा बायोपिक आहे. यामध्ये त्यांच्यापेक्षा चांगले काम कुणीही करु शकत नाही. आता रणबीरने उत्तर देऊन सलमानचे तोंड बंद केले आहे. रणबीर म्हणाला, 'असा एकही बायोपिक नाही, ज्यामध्ये तुम्ही काम केले आहे.' 


भूमिकेचा प्रभाव संपतो
- एका मुलाखती दरम्यान रणबीर सलमानला उत्तर देत म्हणाला की, जेव्हा एखादा व्यक्ती त्याच्यावर तयार होत असलेल्या चित्रपटात काम करतो. तेव्हा त्याचा प्रभाव संपतो. तो म्हणाला की, 'मला माहिती होते, मी ही भूमिका केल्यावर लोक माझी तुलना संजय दत्तसोबत करतील, यामुळे मी ही भूमिका प्रमाणिकपणे साकारली आहे.'
- रणबीर मानतो की, लोकांनी मला 40 वर्षांच्या व्यक्तीच्या अवतारात पाहिले किंवा 20 वर्षांच्या अवतारात मला काही फरक पडत नाही. मी एक कलाकार आहे आणि संजय दत्तची भूमिका साकारत आहे. पण मी दूसरा संजय दत्त बनू शकत नाही हे सत्य आहे.
- सलमान खान रणबीर कपूरच्या अभियनाविषयी बोलला होता. तो म्हणाला होता की, 'संजय दत्त बॉलिवूडमधील असा एक कलाकार आहे, जो अनेक अडचणींचा सामना केल्यानंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक करत आहे. या अडचणींचा त्याच्या फॅन फॉलोइंगवर काहीच प्रभाव पडला नाही.' सलमानला वाटते की, त्यांच्यावर बायोपिक बनत आहे तर यांमध्ये त्यांनीच अभिनय करायला हवा.
- सलमान म्हणाला होता की, दूसरा एखादा अॅक्टर त्यांची भूमिका कशी काय साकारु शकतो. विशेष म्हणजे संजयच्या आयुष्यातील 8-10 वर्षांचा काळ... याचा अभिनय संजयनेच करायला हवा. बॉलिवूडच्या कोणत्याच कलाकारामध्ये एवढा दम नाही की, तो पडद्यावर संजयची भूमिका साकारु शकेल. 

बातम्या आणखी आहेत...