आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'ते सहज माझी प्रशंसा करत नाही, आई कडून म्हणून घेतात'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंड डेस्क : 17 जूनला जगभरात फादर्स डे साजरा करण्यात आला. फादर्स डे निमित्त रणबीर कपूरने आपल्या वडिलांविषयी गोष्टी शेअर केल्या. त्याच्या आयुष्यात वडिलांचे काय स्थान आहे. त्या दोघांचे नाते कसे आहे याविषयी त्यांने सांगितली.

 

'ते जेव्हा कामात खूप व्यग्र असत, तेव्हाही कामावरून परतल्यानंतर आमच्यासोबत वेळ घालवत असत.' 
मी जेव्हा मोठा होऊ लागलो तेव्हा त्यांच्याप्रमाणेच अभिनेता होण्याची इच्छा होती. अभिनय हे त्यांचे वेड आहे. आम्हा दोघांत अगदी जुन्या काळातील वडील-मुलगा असे संबंध आहेत. मी तर आजही त्यांच्या डोळ्यांना डोळे भिडवून बोलू शकत नाही. माझ्या आजोबांचे त्यांच्याशी जसे नाते होते अगदी तसेच नाते माझ्याशी ठेवण्याची त्यांची इच्छा असायची. लहानपणी मी त्यांच्यासोबत जेवायलाही घाबरत असे. तेव्हा मला भाजी आवडत नसे. चिकन खात असे. त्या वेळी त्यांनी आवाजातही भाजी खाण्यास सांगितल्यावर मला रडू फुटत असे. ते निश्चित भूमिका घेणाऱ्यांपैकी एक आहेत. टीकेची पर्वा करत नाहीत. स्वत:चे म्हणणे मांडतातच. ते सहजपणे माझी स्तुती करत नाहीत. मम्मीमार्फत बोलून दाखवतात. मी जेव्हा काही चांगले करतो, तेव्हा ते मोजक्या शब्दांत सांगून निघून जातात. त्यांची ही पद्धतही मला खूप चांगली वाटते. त्यामुळे मी जास्त उत्साही राहतो. ते खूप जिद्दी आहेत. जी गोष्ट त्यांना चांगली वाटली ती ते करतातच. या वयातही वेगवेगळ्या भूमिका करण्याची त्यांची इच्छा आहे. नात्यांबाबत ते कमिटेड आहेत. जी व्यक्ती त्यांना आवडली, तिच्यासोबत अखेरपर्यंत नाते टिकवणाऱ्यांपैकी ते एक आहेत. 

बातम्या आणखी आहेत...