आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Sanju ने 15 दिवसांत जमवला 500 कोटींचा गल्ला, हे आहेत यावर्षी सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क - राजकुमार हिरानी यांचा चित्रपट संजूने 15 दिवसांत 500 कोटी रुपयांच्या कमाईचा जादुई आकडा पार केला आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी शनिवारी ट्वीट करून ही माहिती दिली. त्यानुसार, "संजू'ने शुक्रवार पर्यंत जगभरात 500.43 कोटी रुपयांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे." हा चित्रपट तयार करण्यासाठी 100 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. रणबीर कपूर स्टारर हा चित्रपट 29 जून रोजी रिलीझ झाला होता. दुसऱ्या आठवड्यातच संजू ब्लॉकबस्टर हिट ठरला. सोबत 2018 मध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत संजूने नंबर एकचा खिताब मिळवला आहे. 

 

संजय लीला भंसाळी यांचा वादग्रस्त चित्रपट 'पद्मावत'ने भारतात 25 दिवसांत 262.63 कोटींची कमाई केली होती. याच दरम्यान चित्रपचटाचे वर्ल्डवाइड कलेक्शन 499 कोटींच्या घरात होते. 'संजू' ने 500 कोटींचा गल्ला फक्त 15 दिवसांत जमवला आहे. 


भारतातील कलेक्शन 300 कोटी
'संजू'ने भारतात पहिल्याच आठवड्यात 202.51 कोटींची, तर दुसऱ्या आठवड्यात 92.67 कोटी रुपयांची कमाई केली. देशात या चित्रपटाची कमाई 295.18 कोटी रुपये झाली आहे. जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात हा चित्रपट सहज 300 कोटींचा गल्ला करू शकेल.


रणबीरसाठी सर्वात मोठा हिट चित्रपट
'संजू' चित्रपटाचे कलेक्शन पाहिल्यास हा रणबीर कपूरचा सर्वात यशस्वी चित्रपट ठरला आहे. यापूर्वी रणबीरचा 'ये जवानी है दीवानी' (2013), 'ऐ दिल है मुश्किल' (2016) आणि बर्फी या तिन्ही चित्रपटांनी प्रत्येकी 100-100 कोटींहून अधिक कमवले आहे. 


दोन आठवड्यांपासून एकही मोठा चित्रपट नाही
'संजू' चित्रपटामुळे जुलैच्या सुरुवातीच्या आठवड्यात कुठलाही मोठा चित्रपट रिलीझ झाला नाही. 6 जुलै रोजी हॉलिवूड मेगाबजेट चित्रपट ‘अॅन्ट मॅन अॅन्ड द वास्प’ रिलीझ होणे अपेक्षित होते. परंतु, चित्रपटाची रिलीझ पुढे ढकलावी लागली. सोबतच, सूरमा चित्रपट 13 जुलै रोजी रिलीझ करण्यात आला.

 

बातम्या आणखी आहेत...