आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Sanju ने 7 दिवसांत कमावले 202.51 कोटी, 200 कोटी क्लबमध्ये पोहचला रणबीर कपूरचा पहिला चित्रपट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


संजय दत्तचा बायोपिक 'संजू' हा चित्रपट दररोज नवीन रेकॉर्ड प्रस्थापित करत आहे. चित्रपटाची यशस्वी घौडदौड बॉक्स ऑफिसवर सुरु असून या चित्रपटाने रिलीजच्या अवघ्या सात दिवसांत तब्बल 202.51 कोटींचे कलेक्शन केले आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्शच्या मते, चित्रपटाने रिलीजच्या सातव्या दिवशी 16.10 कोटींचा व्यवसाय केला आहे.

 

200 कोटी क्लबमध्ये दाखल झालेला रणबीरचा पहिला चित्रपट....
संजू हा चित्रपट रणबीर कपूरच्या करिअरमधील मैलाचा दगड ठरला आहे. गेल्या काही वर्षांपासून रणबीर हिट चित्रपटाच्या प्रतिक्षेत होता. त्याचा जग्गा जासूस हा मागील चित्रपट फ्लॉपच्या यादीत जमा झाला होता. पण संजूने त्याची करिअरची गाडी पुन्हा एकदा रुळावर आणली असून दोनशे कोटी क्लबमध्ये दाखल झालेला हा त्याचा पहिलाच चित्रपट आहे. 

 

7 दिवसांच्या कलेक्शनमध्ये 'बाहुबली 2' सर्वांच्या पुढे... 
7 दिवसांत सर्वाधिक कमाई करणा-या चित्रपटांच्या यादीत संजू चौथ्या स्थानावर आहे. 'बाहुबली 2' (हिंदी)ने 247 कोटी, 'सुल्तान'ने 229.16 कोटी, 'टाइगर जिंदा है'ने 206.04 कोटींचे कलेक्शन रिलीजच्या सात दिवसांत केले होते. 

 

संजूचे बॉक्सऑफिस कलेक्शन


दिवस
कलेक्शन (रु.)
शुक्रवार 34.75 कोटी
शनिवार 38.60 कोटी
रविवार 46.71 कोटी
सोमवार 25.35 कोटी
मंगळवार 22.10 कोटी
बुधवार 18.90 कोटी
गुरुवार 16.10 कोटी
 
100 कोटी+ क्लबमध्ये रणबीरचे 4 चित्रपट
​2012 बर्फी 112.15 कोटी
2013 यह जवानी है दीवानी 188.57 कोटी
2016 ऐ दिल है मुश्किल 112.48 कोटी
2018 संजू 202.51 कोटी

 

दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांच्या दिग्दर्शनाचे कौतुक होत आहे. संजय दत्तच्या आयुष्यावर बेतलेला हा चित्रपट 29 जून रोजी रिलीज झाला. या चित्रपटात रणबीर कपूरसह परेश रावल, विक्की  कौशल यांच्या अभिनयाचे कौतुक होत आहे. चित्रपटात दीया मिर्जा, सोनम कपूर, अनुष्का शर्मा, बोमन इराणी आणि जिम सर्भ यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. 

बातम्या आणखी आहेत...