आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

3 दिवसांत रणबीर कपूरच्या 'संजू' ने कमावले 120 कोटी, बाहुबली 2 चाही विक्रम मोडला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - रणबीर कपूरचा चित्रपट 'संजू' 100 कोटीच्या क्लबमध्ये समाविष्ट झाला आहे. राजकुमार हिराणींच्या दिग्दर्शनात तयार झालेल्या संजू चित्रपटाने तीन दिवसांत 120 कोटींचा बिझनेस केला आहे. संजय दत्तच्या बायोपिकवर तयार करण्यात आलेल्या संजूमध्ये रणबीर कपूरने संजय दत्तची भूमिका केली आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांच्या ट्वीटनुसार तिसऱ्या दिवसाच्या कलेक्शनमध्ये या चित्रपटाने बाहुबली 2 लाही मागे टाकले आहे. 'बाहुबली 2' ने तिसऱ्या दिवशी 46.50 कोटींची कमाई केली होती. तर संजूने 46.71 कोटींची कमाई केली आहे. 

 

टोटल वीकेंड कलेक्शन-120.06 कोटी 

दिवस  कलेक्शन (रु)
शुक्रवार (29 जून) 34.75 कोटी 
शनिवार (30 जून) 38.60 कोटी 
रविवार (1 जुलाई)

46.71 कोटी 

2018 मध्ये रिलीज झालेल्या सर्व चित्रपटांना पछाडले

'संजू' चित्रपटाने यावर्लीषी म्हणजे 2018 मध्ये रिलीज झालेल्या सर्व चित्रपटांना ओपनिंग वीकेंड कलेक्शनच्या बाबतीत पछाडले आहे. 

चित्रपट टोटल वीकेंड कलेक्शन (इंडिया)
संजू

120.06 कोटी रुपये

पद्मावत

114 कोटी(या चित्रपटाला 5 दिवसांचा वीकेंड मिळाला होता. बुधवारी प्रिव्ह्यू आणि गुरुवार रिलीज झाला होता)

रेस 3

106.47 कोटी

बागी 2

73 कोटी 

रेड 41.01 कोटी 

पहिल्या दिवसाच्या कमाईतही पुढे

पहिल्या दिवसाच्या कलेक्शनच्या बाबतीतही संजू यावर्षी रिलीज झालेल्या चित्रपटांमध्ये सर्वात आघाडीवर आहे. 

चित्रपट फर्स्ट डे कलेक्शन
संजू 34.75 कोटी रुपये
रेस 3 29.17 कोटी रुपये
बागी 2 25.2 कोटी रुपये
पद्मावत 19+5(पेड प्रिव्यू)=24 कोटी रुपये
पॅडमॅन 10.26 कोटी रुपये

 

 

 

 

 

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...