आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

December अखेरीस चीनमध्ये रिलीज होऊ शकतो 'संजू', नेटफ्लिक्स आणि हॉटस्टारला मिळाले डिजिटल राइट्स

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : रणबीर कपूर स्टारर 'संजू' चित्रपट 300 कोटींच्या क्लबमध्ये समाविष्ट झाला आहे. चित्रपटाच्या यशामुळे फॉक्स स्टार स्टूडियोज खुप आनंदी आहे. स्टूडिओचे सीईओ विजय सिंह सांगतात की, 'चायनीज डिस्ट्रीब्यूटर्सने या चित्रपटामध्ये इंट्रेस्ट दाखवला आहे. या वर्ष अखेरपर्यंत चीनमध्ये हा चित्रपट रिलीज होऊ शकतो. चायनिज प्रेक्षकांना इमोशनल चित्रपट खुप आवडतो.'दंगल'मध्ये बाप लेकींच्या इमोशनल नाते होते आणि या चित्रपटाने चीनमध्ये इतिहास रचला.'


'संजू' मध्ये बाप-लेकाच्या नात्याची गोष्ट आहे. तेथील डिस्ट्रीब्यूटर्स चित्रपटात इंट्रेस्ट दाखवत आहे. 'संजू'चे डिजिटल राइट्स हॉट स्टार आणि नेटफ्लिक्स दोघांनाही देण्यात आले आहे. लवकरच हे दोघं आपापल्या प्लॅटफॉर्मवर याची स्ट्रीमिंग डेट अनाउंस करणार आहेत.

 

रणबीरचा सर्वात मोठा हिट चित्रपट
'संजू' कलेक्शनच्या हिशोबाने रणबीरचा पहिला सर्वात मोठा चित्रपट आहे. यापुर्वी त्याचा 'ये जवानी है दीवानी' (2013) चे लाइफटाइम कलेक्शन 112.14 कोटी आणि  'ऐ दिल है मुश्किल' (2016) चे कलेक्शन 112.14 कोटी झाले होते. बर्फीने एकूण 106.11 कोटींची कमाई केली होती. 

 

दोन आठवडे मोठा चित्रपट रिलीज नाही
'संजू'मुळे जुलैच्या पहिल्या दोन आठवड्यात कोणतेही मोठे चित्रपट रिलीज झाले नाही. 6 जुलैला हॉलिवूडचा मेगाबजेट चित्रपट 'एंट मॅन एंड द वॅस्प' रिलीज होणार होता. परंतू तो चित्रपट टाळण्यात आला. हा चित्रपट 13 जुलै रोली 'सूरमा' चित्रपटासोबत रिलीज करण्यात आला. या आठवड्यात 20 जुलै रोजी जान्हवी कपूर आणि ईशान खट्टचा धडक चित्रपट रिलीज होणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...