आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुपम खेरपासून शिल्पा शेट्टीपर्यंत, अनिल कपूरच्या घराबाहेर स्पॉट झाले हे सेलेब्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवींचा शनिवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. दुबईमध्ये लग्नसमारंभासाठी गेलेले असताना ही घटना घडली. श्रीदेवी या 54 वर्षांच्या होत्या. त्यांच्या अकाली जाण्याने देशभरात हळहळ व्यक्त केली जातेय. तब्बल 50 वर्षे बॉलिवूडमध्ये श्रीदेवीने काम केले. वयाच्या 4 थ्या वर्षापासून श्रीदेवीने अभिनयास सुरुवात केली. 'मॉम' हा चित्रपट श्रीदेवीचा शेवटचा चित्रपट ठरला. आता या बॉलिवूडच्या 'चांदणी' ला निरोप द्यायची वेळ आली आहे. सोमवारी सकाळीच श्रीदेवींचे पार्थिव मुंबईमध्ये दाखल होणार आहे. सुत्रांनुसार सोमवारी दुपारी 1 वाजता जुहूच्या पवनहंस मुक्तिधाम येथे श्रीदेवीचा अंत्यविधी करण्यात येईल. श्रीदेवींच्या निधनाची बातमी समजताच बॉलिवूडचे कलाकार हे अनिल कपूर यांच्या घरी येत आहेत. रविवारी रात्री बॉलिवूडचे अनेक सेलेब्स अनिल कपूर यांच्या घराबाहेर स्पॉट झाले. शिल्पा शेट्टी, अनुपम खेर, डेविड धवन, शबाना आझमी, महिप कपूर, राणी मुखर्जी असे अनेक सेलेब्स यावेळी स्पॉट झाले.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा अनिल कपूर यांच्या घराबाहेर आलेल्या सेलेब्सचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

हेही वाचा

 

श्रीदेवी यांच्या न ऐकलेल्या गोष्टी : प्रत्येक चित्रपटात श्रीदेवीसोबत काम करु इच्छित होते जितेंद्र

मुलीला मोठ्या पडद्यावर पाहण्याचे स्वप्न अधुरे, या सेलेब्ससोबतही घडले असेच काही

वयाच्या 54 व्या वर्षी श्रीदेवीने घेतला जगाचा निरोप, पाहा बालपणापासून ते आत्तापर्यंतचे फोटोज

शेवटच्या क्षणी मुलीचा चेहराही पाहू शकली नाही श्रीदेवी, दुबईमधून आली मृत्यूची बातमी

आईला मृत्यूने गाठले तेव्हा कुठे होती जान्हवी?, मायलेकींमध्ये होती मैत्रिणींसारखी Bonding

 

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...