आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नापुर्वीच रणवीरने दीपिकासाठी खरेदी केले नवीन घर, असा आहे प्लान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : सध्या दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंहच्या लग्नाच्या सर्वात जास्त चर्चा सुरु आहे. रिपोर्ट्सनुसार दोघंही याच वर्षी 18 ते 20 नोव्हेंबरच्या काळात लग्न करु शकतात. लग्नानंतर हे कपल नवीन घरात शिफ्ट होणार अशाही चर्चा आहेत. याच कारणांमुळे रणवीरने दीपिकासाठी बांद्रा-खार विभागाच्या श्री अपार्टमेंटमध्ये घर खरेदी केले आहे. यापुर्वी त्यांनी वरळीमध्ये एक  5BHK अपार्टमेंट खरेदी केले होते. परंतू हा त्याला पसंत पडला नाही.

 

रणवीर सध्या जिथे राहतो, त्याच बिल्डिंगमध्ये खरेदी केली घर
- सोर्सेजनुसार रणवीर सध्या ज्या बिल्डिंगमध्ये राहतो, तिथेच त्याने नवीन घर खरेदी केले आहे. रणवीर आणि त्याचे कुटूंब सध्या श्री अपार्टमेंटमध्ये राहते. याच बिल्डिंगच्या चौथ्या मजल्यावर आता त्याने दीपिकासाठी 3BHK अपार्टमेंट खरेदी केले आहे. सध्या घरात

रिनोवेशनचे काम सुरु आहे.


- खरेतर रणवीरला लग्नानंतर आपल्या कुटूंबाजवळच राहायचे आहे. मुंबईतच त्याचे बालपण गेले आहे. तर दीपिकाचे घर बेंगलुरुमध्ये आहे ती अनेक वेळा तिकडे जात असते. लग्नानंतर तिच्या कामामुळे तिचा जास्तीत जास्त वेळ मुंबईतच जाईल. यामुळे रणवीरने तिच्यासाठी नवीन घर घेण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या घराचे इंटीरिअर रणवीर-दीपिकाच्या आवडीनुसार तयार केले जात आहे.

 

आईसोबत शॉपिंग करताना दिसली होती दीपिका...
बुधवारी दीपिका आपली आई उज्ज्वलासोबत बांद्रामध्ये शॉपिंग करताना दिसली. दोघीही एका ज्वेलरी शॉपच्या बाहेर स्पॉट झाल्या. दीपिका शॉपिंगसाठी आईसोबत पोहोचली होती असे म्हटले जात आहे. वृत्तांनुसार दीपिका आणि रणवीरला डेस्टिनेशन वेडिंग करायची होती, परंतू रणवीरच्या कुटूंबाला मुंबईत लग्न व्हावे असे वाटते.

 

लग्नानंतर होऊ शकतात दोन रिसेप्शन
रिपोर्ट्सनुसार लग्नानंतर दीपिका आणि रणवीर आपले रिलेटिव्ह आणि फ्रेंड्ससाठी दोन रिसेप्शन प्लान करत आहेत. पहिले रिसेप्शन मुंबईत होईल. तर दूसरे रिसेप्शन दीपिकाचे होमटाउन बेंगलुरुमध्ये होऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...