आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day: वयाने 15 वर्षांनी मोठ्या तरुणीच्या प्रेेमात पडले होते नसीर, केले लग्न पण टिकले नाही नाते

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बॉलिवूड डेस्कः बॉलिवूड अभिनेते नसीरुद्दीन शाह यांचे नाव येताच एक साध्या आणि आकर्षक व्यक्तिमत्वाचे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. त्यांचा चेहरा जरी साधारण असला तरी प्रतिमा मात्र अतुलनीय आहे. हिंदी सिनेमांमध्ये त्यांचे योगदान वाखण्याजोगे आहे. बॉलिवूडच्या या उत्कृष्ट कलाकारचा आज 69 वा वाढदिवस आहे. नसीरुद्दीन शाह यांचा जन्म उत्तरप्रदेशच्या बाराबंकीमध्ये 20 जुलै 1949 रोजी झाला. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या नसीर यांनी अलीगढ विद्यापीठातून आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला. अभिनयाचे धडे घेतल्यानंतर नसीर यांनी हिंदी सिनेमाकडे आपला मोर्चा वळवला. 


स्वतःपेक्षा 15 वर्षांनी मोठ्या तरुणीसोबत थाटले होते पहिले लग्न... 
नसीर यांच्या पहिल्या पत्नीचे नाव मनारा सिकरी उर्फ परवीन मुराद होते. त्या अभिनेत्री सुरेखा सिकरी यांच्या बहीण होत्या. नसीर आणि मनारा उर्फ परवीन यांच्या वयात 15 वर्षांचे अंतर होते. मनारा या नसीर यांच्यापेक्षा 15 वर्षांनी मोठ्या होत्या. लग्नाच्या वेळी नसीर 20 तर मनारा सिकरी 35 वर्षांच्या होत्या. जेव्हा नसीर यांनी मनारा यांच्यासोबत लग्नाचा निर्णय घेतला तेव्हा त्यांचे कुटुंबीय या लग्नाच्या विरोधात होते. पण घरच्यांचा विरोध झुगारुन त्यांनी मनारा यांच्यासोबत लग्न केले होते.  पहिल्या लग्नापासून नसीर यांना एक मुलगी असून तिचे नाव हिबा आहे.  


अलीगड युनिव्हर्सिटी झाली होती भेट...

मनारा अलीगड युनिव्हर्सिटीच मेडिकलचे शिक्षण घेत होत्या. तर नसीर येथून ग्रॅज्युएशन करत होते. येथेच दोघांची भेट झाली, भेटीचे रुपांतर प्रेमात झाले आणि दोघांनी निकाह केला. पण हे नाते वर्षभरही टिकले नाही. लग्नाच्या दहा महिन्यांत त्यांची मुलगी हिबा हिचा जन्म झाला. मुलीच्या जन्मानंतर नसीर दिल्लीत आले आणि त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामात प्रवेश घेतला. हळूहळू मनारा आणि नसी यांच्यात दुरावा निर्माण होऊ लागला. त्यानंतर मनारा मुलगी हिबाला घेऊन सुरुवातीला लंडन आणि नंतर इराणला निघून गेली. नसीर आणि मनारा यांचा घटस्फोट झाला. 


नसीर यांनी व्हावे आर्मी ऑफिसर, अशी होती वडिलांची इच्छा...
थिएटर आणि बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारे नसीर अभ्यासात फारसे हुशार नव्हते. नसीर यांचे वडील मोहम्मद शाह यांची इच्छा होती, त्यांनी डॉक्टर, इंजिनिअर किंवा आर्मी ऑफिसर व्हावे. पण अभ्यास रुची नसल्याने नसीर यापैकी कुठल्याच क्षेत्राकडे वळले नाहीत. नसीर यांनी त्यांच्या चार मित्रांसोबत मिळून मर्चेंटफ वेनिसची स्थापना केली. याच नावाने 1969 मध्ये एक चित्रपट बनला होता, पण तो कधीच चित्रपट कधीच रिलीज झाला नाही. 

 

पुढे वाचा, जेव्हा शबाना आझमी नसीर यांना म्हणाल्या होत्या, कुरुप लोक अॅक्टर व्हायची हिंमत कशी करु शकतात... 

 

बातम्या आणखी आहेत...