आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्पवयीन मुलीला kiss करणाऱ्या गायकावर भडकली रवीना, म्हटली \'अरेस्ट करायला हवे\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सिंगींग रिअॅलिटी शोचा मेंटर पॅपोनने एका अल्पवयीन मुलीला जबरदस्ती किस करण्याच्या प्रकरणाने चांगलाच जोर धरला आहे. अभिनेत्री रवीना टंडन पॅपोनच्या या कृत्याने चांगलीच नाराज झाली आहे. तिने पॅपोनला अरेस्ट करायला हवे असे ट्वीट केले आहे. तिने लिहीले की, Disgusting! Shameful!Perverse! This man Papon should be arrested ! The girls parents succumbing to pressure ! The explanations given are ridiculous! Haven’t felt such anger and shame to see this happen and some on tv debates actually defending the act !. गौहर खाननेही साधला पॅपोनवर निशाना..

 

अभिनेत्री गौहर खानने ट्वीट केले की, 'Wasn't smothering a child's face with your palm rubbing color all over it for 4 secs enough as fatherly love, that u had to pull the child's face then to strategically peck her on the lip??? There was no wrong camera angle or the child moving her face mistakenly BTW 🙄😡#papon👎'.

 

पॅपोनने तोडले प्रकरणावर मौन..
अल्पवयीन मुलीला किस करण्यावर पॅपोनने अशी सफाई दिली आहे की, त्याच्याकडून चुकी झाली आहे आणि त्याने तिच्यावर अतीप्रसंग करण्याचा प्रयत्न केलेला नाही. असा आरोप लावणाऱ्या लोकांनी त्याच्या आणि सदर मुलीच्या कुटुंबीयांच्या भावनांचा विचार केला पाहीजे. त्याने सांगितले की तो शोमधील स्पर्धकांना अगदी त्याच्या मुलांप्रमाणे जीव लावतो. 

 

मुंबई पोलिसांनी दिले चौकशीचे आदेश..
पॅपोनद्वारा अल्पवयीन मुलीला जबरदस्ती किस करण्याचे प्रकरण महाराष्ट्र सरकारने विचारात घेतले आहे. मुंबई पोलिसांनी यासंबंधीत पोलिसांना चौकशीचे आदेश दिले आहेत. प्रपोनने स्वतःच एक लाईव्ह व्हिडिओ फेसबुकवर टाकला होता. पॅपोनविरुद्ध 
(POCSO)अॅक्टअंतर्गत केस दाखल केली आहे. 

 

दाखल केला गुन्हा...
- या घटनेचा व्हिडिओ पाहिल्यानंतर सुप्रीम कोर्टाचे वकिल रुना भुयन यांनी त्यांच्याविरुद्ध केस दाखल केली आहे. 
- रुना यांनी सांगितल्यानुसार, मी सिंगर पॅपोन यांचे वर्तन बघून परेशान झाली आहे. तिने सांगितले की पहिले पॅपोनने त्या मुलीला रंगवले आणि नंतर तिला चुकीच्या पद्धतीने किस केले. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, पॅपोनचे काही खास Photos..

बातम्या आणखी आहेत...