आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

..नसता अखेरच्या क्षणी एकटीच असती श्रीदेवी, यामुळे सोबत होते बोनी कपूर आणि खुशी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइलफोटो - Divya Marathi
फाइलफोटो

एंटरटेनमेंट डेस्क - श्रीदेवी हिच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का दिला आहे. तिच्या अखेरच्या क्षणांमध्ये मुलगी जान्हवी आणि तिची भेट होऊ शकली नाही याचे दुःख सगळेच व्यक्त करत आहेत. पण सुत्रांच्या माहितीनुसार केवळ योगायोग म्हणून श्रीदेवीचे पती बोनी कपूर आणि मुलगी खुशी हे अखेरच्या क्षणी तिच्या बरोबर होते. नसता अखेरच्या क्षणी तिला पती किंवा मुली यापैकी कोणीही तिच्याबरोबर राहिले नसते. 


सरप्राइज देण्यासाठी गेले होते बोनी कपूर
> भाचा मोहीत मारवाह याच्या लग्नासाठी श्रीदेवी पती बोनी कपूर आणि मुलगी खुशी यांच्याबरोबर दुबईला गेली होती. 
> गेल्या आठवड्यामध्ये कपूर कुटुंबीयांनी दुबईतील हॉटेलमध्ये लग्नात सहभाग घेतला.
> ठरलेल्या कार्यक्रमानुसार सर्वकाही घडले असते, तर आजच्या या दुर्दैवी घडीला बोनी कपूर आणि त्यांची लहान मुलगी खुशी कपूर त्यांच्याबरोबर दुबईत नसते. 
> त्याचे कारण म्हणजे लग्न आटोपल्यानंतर बोनी कपूर आणि त्यांची लहान मुलगी खुशी हे मुंबईला परतले होते. 
> श्रीदेवी मात्र त्यांची बहीण श्रीलता यांच्याबरोबर वेळ घालवण्यासाठी म्हणून दुबईत थांबल्या होत्या. 
> पण बोनी कपूर श्रीदेवी सरप्राइज देण्यासाठी म्हणून मुंबईहून पुन्हा दुबईला गेले होते. त्यांना सोबतच घेऊन यायचे असे त्यांनी ठरवले होते. 
> त्यामुळेच योगायोगाने बोनी कपूर अखेरच्या क्षणी श्रीदेवी यांच्याबरोबर दुबईत होते. 

 

पुढे पाहा काही PHOTOS..

बातम्या आणखी आहेत...