आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ना चित्रपट ना कुठली जाहिरात, मग कसा भागतो रेखाचा दररोजचा खर्च?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः बॉलिवूडची एव्हरग्रीन अॅक्ट्रेस रेखा वयाच्या 63 व्या वर्षीही अतिशय सुंदर दिसतात. सौंदर्य आणि अभिनयाच्या बळावर त्यांनी एक काळ बॉलिवूड इंडस्ट्रीवर अधिराज्य गाजवले आहे. फिल्मी करिअरच्या काळात केवळ कामामुळेच नव्हे तर लव्ह लाईफमुळेही त्या चर्चेत राहिल्या. त्यांची स्लीक स्टाइल आजही पसंत केली जाते. आज त्या सिनेसृष्टीत अॅक्टिव नाहीत किंवा जाहिरातींमध्येही त्या झळकत नाहीत. मग त्या स्वतःची एवढी लॅव्हिश लाइफस्टाइल कशी मेंटेन करतात? त्यांचा खर्च कसा भागतो? हा प्रश्न नक्कीच त्यांच्या चाहत्यांना पडत असले.

 

- रेखा आता चित्रपटांमध्ये क्वचितच दिसतात. सिनेसृष्टीत अॅक्टिव नसताना त्यांच्याकडे पैसे कुठून येतात. त्यांचा खर्च कसा चालतो? हा प्रश्न नक्कीच तुमच्या मनात डोकावला असेल. सूत्राच्या माहितीनुसार, रेखा यांच्याजवळ मुंबई आणि साऊथ इंडियात काही प्रॉपर्टी आहे. ती प्रॉपर्टी रेखा यांनी भाड्याने दिली आहे.

- शिवाय रेखा राज्यसभेत खासदार आहेत. याचे मानधन त्यांना मिळते.

- इतकेच नाही तर अनेक प्रसिद्ध ब्रॅण्ड्सच्या उद्घाटन समारंभाला हजेरी आणि अवॉर्ड शोमधून त्यांची कमाई होत असते.

 

वयाच्या 14 व्या वर्षापासून काम करत आहेत रेखा...

- रेखा यांनी फिल्मी करिअरची सुरुवात वयाच्या चौदाव्या वर्षापासून केली. पण त्यांचा हा प्रवास सोपा नव्हता. 
 - तामिळ सुपरस्टार जेमिनी गणेशन आणि तेलुगु अभिनेत्री पुष्पवल्ली यांची रेखा कन्या आहे. पण त्यांनी यश मिळवण्यासाठी कधीही आईवडिलांच्या नावाचा वापर केला नाही.
- रेखा करिअरच्या सुरुवातीच्या काळात  एवढ्या देखण्या नव्हत्या. सावळ्या रंगामुळे त्यांना काम मिळत नव्हते. पण 1976 मध्ये आलेल्या 'दो अंजाने' या चित्रपटानंतर त्यांचे नशीब पालटले. मोठ्या पडद्यावर अमिताभ बच्चन यांच्यासोबतची त्यांची जोडी प्रेक्षकांना विशेष भावली. 


पुढील स्लाईड्सवर बघा, रेखा यांचे निवडक फोटोज...  

बातम्या आणखी आहेत...