आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीदेवीचा मृत्यू पूर्वनियोजित असल्याचा माजी एसीपीचा दावा, दाऊदचा हात असण्याचीही वर्तविली शक्यता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीदेवीच्या मृत्यूमागे अजूनही शंका-कुशंकाचे वादळ सुरु आहे. दिल्लीचे रिटार्ड एसीपी वेद भूषण यांचे म्हणणे आहे की, श्रीदेवीचा मृत्यू बाथटबमध्ये पडून झालेला नाही तर हे संपूर्णपणे एक कट कारस्थान होते. मिळालेल्या माहितीनुसार, आता पूर्व एसीपी यांनी अशी शंका व्यक्त केली आहे ती या प्रकरणात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम याचाही हात असू शकतो. एसीपीने दिला हा तर्क...

माजी एसीपी यांनी सांगितल्यानुसार दाऊदची दुबईमध्ये मजबुत पकड आहे आणि तेथील प्रिंसच्या कुटुंबासोबतही त्याचे चांगले संबंध आहेत. यामुळे श्रीदेवीच्या मृत्यूमागे दाऊदचा हात असल्याची शक्यता नाकारता येत नाही. माजी एसीपी यांनी दावा केला आहे की त्यांची शंका दूर करण्यासाठी ते एक रात्र हॉटेल जुमेराह येथे थांबले होते. हे हॉटेल दाऊदचे आहे. भूषण यांनी सांगितल्यानुसार ते आता या प्रकरणाच्या चर्चेसाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करु शकतात कारण श्रीदेवीच्या मृत्यूचे खरे कारण त्यांना शोधून काढायचे आहे. 

 

24 फेब्रुवारी रोजी हॉटेलमध्ये झाला होता श्रीदेवीचा मृत्यू..
24 फेब्रुवारी रोजी हॉटेल जुमेराह येथे श्रीदेवीचा मृत्यू झाला होता आणि त्याचे कारण बाथटबमध्ये पडल्याचे सांगण्यात आले होते. श्रीदेवी बोनी कपूरच्या बहिणीच्या मुलाच्या लग्नात सहभागी होण्यासाठी गेली होती आणि 21 फेब्रुवारीला हे लग्न पार पडले होते. 22 फेब्रुवारीला कपूर आणि मारवाह कुटुंब मुंबईत परतले होते तर 24 फेब्रुवारी रोजी बोनी कपूर पुन्हा दुबईला पोहोचले होते. ते हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर काही तासांतच श्रीदेवी यांचा मृत्यू झाला. 

 

पुढच्या स्लाईडवर वाचा, हॉटेलमध्ये बदलला आहे पूर्ण स्टाफ...

बातम्या आणखी आहेत...