आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Revealed In Medical Reports: Cancer Reached On Fourth Stage Due To Negligence By Sonali

Medical रिपोर्ट्समध्ये खुलासा: सोनालीच्या निष्काळजीपणामुळे चौथ्या स्टेजपर्यंत पोहोचला कँसर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : सोनाली बेंद्रेने तिला कँसर असल्याचा खुलासा गेल्या बुधवारी (4 जुलै) केला. तिला हाय ग्रेड कँसर आहे. तो शेवटच्या स्टेजवर आहे. सध्या सोनाली न्यूयॉर्कमध्ये कँसरवर उपचार घेतेय. या बातमीनंतर बॉलीवूड आणि सोनालीचे फॅन्स ती लवकर बरी व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत. याच काळात मेडिकल रिपोर्ट्समध्ये खुलासा झाला आहे की, सोनालीच्या निष्काळजीपणामुळे तिचा कँसर हाय ग्रेड स्टेजपर्यंत पोहोचला.

 

शरीरात वेदना असूनही दुर्लक्ष करत होती सोनाली
सोनालीवर उपचार करत असलेल्या डॉक्टर्सनुसार, सोनालीला दिर्घकाळापासून शरीरात वेदना होत होत्या. यावर ती दुर्लक्ष करत होती. तिला जेव्हा या वेदना असाह्य झाल्या तोपर्यंत हा आजार चौथ्या स्टेजपर्यंत पोहोचला होता. तिने टेस्ट केल्यानंतर कँसर असल्याचे समोर आले. तिने योग्यवेळी तपासणी केली असती तर सुरुवातीलाच या वेदना कळाल्या असत्या.
- सोनाली बेंद्रेने ट्विटरवर आणि इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली होती. त्यामध्ये मेटास्टेटिक कँसरचा उल्लेख होता. हा कँसर खुप गंभीर रुपात असतो. अशा स्थितीत कँसर सेल्स जलद शरीराच्या दूस-या भागात पसरतात. याला फोर्थ स्टेजचा कँसरही म्हणतात. कँसर सेल्स पसरण्याच्या प्रक्रियेला मेटास्टेसिन म्हणतात.


सुनील शेट्टीने वाढवला आत्मविश्वास
सुनील शेट्टीने सोनाली बेंद्रेचा उल्लेख करत लिहिले की, सोनालीसाठी स्ट्रेंथ, पावर, प्रेम आणि रिकव्हरीची प्रार्थना करतो. सध्या ती ज्या कठीण प्रसंगाचा सामना ती करत आहे. त्याच प्रसंगाचा सामना मुलगा आणि नवरा गोल्डीही करत आहेत. यावेळी पुर्ण कुटूंबाला स्ट्रेंथची गरज आहे. सुनीलने पुढे लिहिले की, 'हा एक असा आजार आहे, ज्यामध्ये तुम्ही स्ट्राँग राहिले आणि कुटूंबाची साथ मिळाली तर तुम्ही लवकर बाहेर निघू शकता.'

 

हाय ग्रेस कँसर म्हणजे काय?
कँसरचा ग्रेड कोणता आहे हे तीन कंडीशनवर ठरते. सर्वात पहिले डॉक्टर कँसरने प्रभावित आणि निरोगी कोशिकांची तुलना करतात. निरोगी कोशिकांच्या ग्रुपमध्ये अनेक प्रकारच्या टिश्यूचा समावेश असतो. जर कँसर झाल्यावर यासोबत मिळत्या जुळत्या परंतू असामान्य टिश्यूचा ग्रुप तपासणीत दिसला तर याला लो-ग्रेड कँसर म्हणतात. जर कँसर प्रभावित टिश्यू निरोगी टिश्यूच्या तुलनेत वेगळ्या दिसत असतील तर त्याला हाय ग्रेड म्हणतात. कँसर कोणत्या गतीने पसरत आहे हे कँसरच्या ग्रेडच्या आधावर डॉक्टरांना कळते.

बातम्या आणखी आहेत...