आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Karenjit Kaur: पोर्नस्टार नाही तर सनी लियोनीला बनायचे होते नर्स

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क: पोर्नस्टार नंतर बॉलिवूडमध्ये आलेल्या सनी लियोनीच्या आयुष्यावर आधारित वेब सीरीज 'करनजीत कौर-द-अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लियोन' प्रेक्षकांनाच्या पसंतीस पडत आहे. झी 5 च्या या शोमध्ये सनी लियोनच्या आयुष्यातील अनेक रहस्य उलगडण्यात आले आहेत. यामध्ये सनी लियोनचे बालपन, कुटूंब आणि पोर्न स्टार बनण्याचा प्रवास दाखवण्यात आला आहे. बालपणी पैशांच्या अडचणींमुळे तिला पेपर विकावे लागले, दुस-यांची घर पेंट करावी लागली याविषयी यामध्ये दाखवण्यात आले आहे. 'पेंटहाउस पेट ऑफ द ईयर' बनल्यानंतर आपल्या कुटूंबाला पोर्न स्टार असण्याविषयी सांगितल्यानंतर त्यांची काय रिअॅक्शन होती. न्यूज इंटरव्ह्यू मध्ये तिचा कसा अपमान करण्यात येत होता. या सर्व गोष्टी वेब सीरीजमध्ये ओपनली सांगण्यात आल्या आहेत. 


तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, सनी लियोन बालपणापासून खुप धार्मिक होती. ती गुरुव्दारामध्ये भजन गात होती. बालपणी तिचे स्वप्न होते की, नर्स बनावे. परंतू तिच्या दैवाने तिला पोर्न इंडस्ट्रीची क्वीन बनवले. धार्मिक कुटूंबातून असूनही तिने बोल्ड पाऊल उचलले. कुटूंबाला न जुमानता तिने पोर्न इंडस्ट्रीवर राज केला. पोर्न इंडस्ट्री सोडल्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये नशीब आजमावले. तिच्यासाठी हा प्रवास सोपा नव्हता. बोल्ड बॅकग्राउंडमुळे तिला टिकेचा सामना करावा लागला. हे सर्व वेब सीरीजमध्ये दाखवण्यात आले आहे. सनीच्या नशीबात प्रेम आणि निंदा समान प्रमाणात आले. सनी लियोनीच्या या वेब सीरीजची पहिल्यापासूनच चर्चा होती. सीरीजमध्ये तिच्या आयुष्यातील अनेक रहस्य उलगण्यात आले आहेत. तिच्या आयुष्यातील संघर्षही यामध्ये दाखवण्यात आला आहे. 


सनी लियोनीने 2011 मध्ये 'बिग बॉस 5' च्या माध्यमातून भारतात पाऊल ठेवले. यानंतर ती घराघरा ओळखली जाऊ लागली. या काळात तिला महेश भट्ट यांनी 'जिम्स 2' चित्रपटाची ऑफर तिला दिली. सनी लियोन 'स्पिलिट्सविला'मध्येही दिसली. तिने एकता कपूरच्या 'रागिनी एमएमएस 2' मध्येही काम केले. 37 वर्षांची सनी लियोनी आपल्या चित्रपटांसोबतच आयटम नंबरसाठीही प्रसिध्द आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...