आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रिया प्रकाशच्या नजरेच्या बाणांनी ऋषी कपूरही झाले घायाळ, म्हणले असे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल क्रश बनलेल्या प्रिया प्रकाशच्या चर्चा थांबायच नाव घेत नाहीये. फक्त 26 सेकंदांच्या एका व्हिडिओमुळे प्रिया एका रात्रीत सुपरस्टार झाली होती. तिच्या नजरेच्या बाणांनी तिने सर्वांनाच घायाळ केले होते. फक्त सामान्य व्यक्तीच तिच्या प्रेमात पडले नाही तर सेलिब्रिटींच्या काळजाचा ठोकाही तिने चुकवला आहे. बॉलिवूड अभिनेते ऋषी कपूर यांनेही तिच्यावर स्तुती सुमनांची उधळण केली आहे. 

 

माझ्या काळात का आली नाही?
ऋषी कपूर यांनी ट्वीट करुन प्रियावर स्तुती सुमन उधळली आहेत. त्यांनी लिहिले की, "मला वाटते की, या मुलीला खुप स्टारडम मिळेल. प्रिया खुप एक्सप्रेसिव्ह आणि निरागस आहे. प्रिया तु तुझ्या वयातील लोकांना चांगलीच कॉम्बिटिशन देणार आहे. देव तुझे चांगले करेल." ते मिश्किलपणे म्हणाले की, तु माझ्या काळात का आली नाही?

 

बॉलिवूडमध्ये काम करणे आहे स्वप्न
प्रिया प्रकाशने एका इंटरव्यूमध्ये सांगितले होते की, बॉलिवूडमध्ये काम करणे तिचे स्वप्न आहे. सध्या ती कॉलेज करतेय. यासोबतच आगामी चित्रपटावर तिला लक्ष केंद्रित करायचे आहे. प्रियाला 'पद्मावत' चित्रपटाचे डायरेक्टर संजय लीला भन्साळींसोबत काम करायची इच्छा आहे. दीपिका तिची आवडती अभिनेत्री आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन बघा प्रिया प्रकाशचे कधीही न पाहिलेले फोटो, बालपणी अशी दिसत होती प्रिया प्रकाश...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...