आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Saif Ali Khan And Kareena Kapoor Wedding Unseen Picture Marriage Attended By Daughter Sara Ali Khan And Son Ibrahim Khan

Unseen Photo: सैफ-करीनाच्या लग्नाचा फोटो, वडिलांच्या दूस-या लग्नात सहभागी होते मुलगा-मुलगी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : सैफ अली खानने 5 वर्षे डेटिंग केल्यानंतर 16 ऑक्टोबर 2012 मध्ये करीना कपूरसोबत दूसरे लग्न केले होते. दोघांच्या लग्नाचा एक अनसीन फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या फोटोमध्ये करीनाची सासू शर्मिला टागोर, नणंद सोहा-सबा अली खानसोबतच सैफच्या पहिल्या लग्नापासूनचे मुलगा-मुलगी इब्राहिम आणि साराही दिसत आहेत. पापा सैफच्या दूस-या लग्नात मुलं आले होते. परंतू पहिली पत्नी अमृता पोहोचली नव्हती. साराने आपल्या मैत्रिणींसोबत लग्नाच्या प्रत्येक फंक्शनमध्ये भाग घेतला होता. त्यावेळी सारा 19 वर्षांची होती. सैफ अली खानने 10 वर्षांनी लहान असलेल्या करीनासोबत लग्न केले होते. यापुर्वी त्याने 1991 मध्ये 13 वर्षे मोठ्या अमृता सिंहसोबत लग्न केले होते. दोघं 2004 मध्ये वेगळे झाले. 


लग्नात पोहोचले अनेक दिग्गज
सैफ अली खान आणि करीना कपूरच्या लग्नाचे फंक्शन एक आठवडा चालले होते. करीनाने मनीष मल्होत्राने डिझाइन केलेला गुलाबी रंगाचा ट्रेडिशनल शरारा घातला होता. तर सैफ अली खानने राघवेंद्र राठोरने डिझाइन केलेला ड्रेस घातला होता. लग्नात कपूर आणि खान कुटूंबीयांसोबतच अनेक दिग्गज सहभागी झाले होते. माजी पंतप्रधान मनमोहन सिंहची पत्नी गुरशरण कौर, क्रोग्रेस नेता राहुल गांधी, फारुख अब्दुल्ला, ज्योतीरादित्य सिंधिया, गीतकार प्रसून जोशी, अभिनेत्री नंदिता दास, क्रिकेटर कपिल देवसोबत बॉलिवूडचे अनेक दिग्गज उपस्थीत होते.
 

बातम्या आणखी आहेत...