आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Pataudi Family Photo: Saif Ali Khan Enjoyed Sister Soha Ali Khan Wedding In Pataudi Palace Family

समोर आला करीनाची नणंद सोहाच्या लग्नाचा Unseen Photo, मस्तीच्या मूडमध्ये दिसला सैफ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


मुंबईः  अभिनेता सैफ अली खानची बहीण सोहा अली खान हिचे  25 जानेवारी 2015 रोजी अभिनेता कुणाल खेमूसोबत लग्न झाले. आता लग्नाच्या तीन वर्षांनी या कपलच्या वेडिंग सेरेमनीचा एक अनसीन फोटो समोर आला आहे. या फोटोत सैफ मस्तीच्या मूडमध्ये सोहा आणि कुणालच्या मांडीवर झोपलेला दिसतोय. तर त्याच्या मागे करीना कपूर, शर्मिला टागोर आणि सबा अली खान उभ्या दिसतात. या फोटोत पतौडी कुटुंब एकत्र आले आहे. 


5 वर्षे डेटिंग आणि लिव्ह इन रिलेशनशिपनंतर सोहाने केले होते लग्न... 
- सोहा अली खानची गणना बॉलिवूडच्या उच्चशिक्षित अभिनेत्रींमध्ये होते. तिने लंडनच्या स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स येथून इंटरनॅशनल रिलेशन्समध्ये मास्टर डिग्री घेतली आहे.
- 4 ऑक्टोबर 1978 रोजी जन्मलेली सोहा दिवंगत क्रिकेटपू मन्सूर अली खान पतौडी आणि अभिनेत्री शर्मिला टागोर यांची लेक आहे. 'रंग दे बसंती', 'साहेब बीवी और गँगस्टर रिटर्न्स', 'दिल मांगे मोर' या चित्रपटांमध्ये अभिनयाची चुणूक दाखवणा-या सोहाने तिचा बॉयफ्रेंड आणि अभिनेता कुणाल खेमूसोबत लग्न केले आहे. 
- या जोडीची भेट 2009 मध्ये 'ढूंढते रह जाओगे' या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. पाच वर्षे डेट आणि लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर  दोघांनी  2015 मध्ये लग्न केले.
- सोहाने एका मुलाखतीत सांगितले होते, "मी कुणालला लग्नानंतर नव्हे तर लग्नापूर्वीच समजून घेतले आहे. मी आणि कुणाल चार वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये पाहिलो. हाच तो काळ होता, जेव्हा मी माझ्या जोडीदाराला समजू शकले." 
- "लग्नानंतर आमच्या दोघांच्याही आयुष्यात फारसे बदल झाले नाहीत.  सगळं पुर्वीसारखचं आहे. समाजात आमच्या नात्याच्या स्वीकारसाठी लग्न फक्त एक फॉर्मेलिटी होती." 
- या दाम्पत्याला एक मुलगी असून इनाया नौमी हे तिचे नाव आहे. सप्टेंबर 2017 मध्ये सोहाने इनायाला जन्म दिला.  

बातम्या आणखी आहेत...