आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळवीट प्रकरणी निर्दोष मुक्त झाल्यानंतर रानडुक्कर शिकार प्रकरणात अडकला सैफ अली खान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 1998 च्या काळवीट प्रकरणी निर्दोष मुक्तता झाल्यानंतर आता सैफ अली खान रानडुक्करच्या शिकारी प्रकरणी अडकला आहे. इंटरपोलमधून नोटिस आल्यानंतर मुंबई क्राइम ब्रांचने सैफ अली खानचा जबाब नोंदवला आहे. सूत्रांनुसार, बुल्गारिया सरकराने काही दिवसांपुर्वीच एका रानडुक्करराच्या शिकारी संदर्भात सैफ अली खानचा जबाब मागितला होता. सैफने जबाब नोंदवला आहे. या महिन्याच्या सुरुवातीस मुंबई क्राइम ब्रांचच्या एका टीमने सैफचा जबाब रेकॉर्ड केला आहे.

 

काय आहे प्रकरण...
ज्या एजेंटने सैफ अली खानसाठी रानडुक्कराची शिकार केली होती, त्याला बुल्गारिया पोलिसांनी अटक केली आहे. शिकारीसाठी आवश्यक लायसन्स आणि परवाणगी घेण्यात आली नव्हती. बुल्गारिया पोलिस याबाबतीत तपास करत आहे. यामध्ये सैफ अली खानला साक्षीदार बनवण्यात आले आहे.

 

काय होते काळवीट शिकार प्रकरण...
सप्टेंबर 1998 मध्ये सुरज बडजात्याचा चित्रपट 'हम साथ साथ है'ची शूटिंग सुरु होती. यावेळी सलमान खान, सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम हे शिकार करण्यासाठी गेले. त्यांच्यावर आरोप होता की, त्यांनी काळवीट शिकार केली. सलमानने काळवीट शिकार केली असे बोलले जात होते. त्यांच्यासोबतच्या कलाकारांवर आरोप लावण्यात आले होते. आता सलमान व्यतिरिक्त इतर सर्व कलाकारांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
 

बातम्या आणखी आहेत...