आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीरिअड फिल्ममध्ये नागा साधूच्या भूमिकेत दिसणार सैफ अली खान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क: बॉलिवूड अॅक्टर सैफ अली खान त्याच्या आगामी चित्रपटात नागा साधूची भूमिका साकारताना दिसणार आहे. यासाठी सैफ गेल्या काही महिन्यांपासून आपली दाढी आणि केस वाढवत आहे. अजुन या चित्रपटाचे नाव ठरलेले नाही. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटाचे नाव 'हंटर' असू शकते. हा चित्रपट 1780 च्या काळातील आहे.


चित्रपटाविषयी बोलताना सैफ म्हणाला की, मी चित्रपटात कपडे घालतो. हे मी घालायला नाही पाहिजे, कारण नागाचा अर्थ नग्न असा होता. चित्रपटात मी एका अयशस्वी नागा साधुच्या भूमिकेत आहे, ज्याला सूड घ्यायचा असतो. हा एक ड्रामा चित्रपट आहे. राजस्थानच्या पृष्ठभूमीवर आधारित हा चित्रपट आहे. मला या भूमिकेसाठी माझे कान टोचावे लागले. याविषयी मी पहिल्यापासूनच चिंतेत होतो. माझे केस बरेच मोठे झाले आहेत. या उष्णतेत राजस्थानमध्ये शूटिंग करताना मला खुप अडचण आली. कधी-कधी केस आणि मेकअप सेट करण्यात 40 ते 2 तासही लागतात.


सैफने पुढे सांगितले की, आतापर्यंत 50 टक्के चित्रपटाचे काम पुर्ण झाले आहे. त्याने सांगितले की, नागा साधुची भूमिका माझ्यासाठी खुप विचित्र होती. परंतू आता हे माझ्या आयुष्याचा भाग बनले आहे. सैफ म्हणाला की, "मला नेहमीच जाणिव झाली आहे की, कुणी तरी आहे जो मला सर्व काही देत आहे, जे मी डिजर्व्ह करत नाही. या भूमिकेविषयी मला असेच वाटत आहे. हा अनुभव खुपच चांगला राहिला. केस आणि मेकअपला 2 तास लागत होते. मला हे खुप हास्यास्पद वाटत होते. हे वेस्टर्न चित्रपटाच्या कॅरेक्टरप्रमाणे वाटत होते, जे दूस-या स्पेसवर जातात. या शूटच्या निमित्ताने मला जुने किल्ले पाहण्याची संधी मिळाली."


सैफ अली खानने आपल्या भूमिकेविषयी सांगताना म्हटले की, 'अशा प्रकारची भूमिका करणे माझ्यासाठी खुप अवघड होते. कारण यामध्ये मला आणि जगाला फक्त मीच या जगात सर्वात खतरनाक तलवारबाज आहे हे सांगायचे होते.' सैफने सांगितले की, 'अनेक लोक मला म्हणाले की, माझा लूक खुप बदलला आहे आणि आता मी लवकरच नॉर्मल होण्याचा प्रयत्न करेल.'

बातम्या आणखी आहेत...