आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Dhadak Vs Sairat: Sairat And Dhadak Budget Difference And Jhanvi Kapoor To Rinku Rajguru Fees

'Sairat'पेक्षा 10 पट जास्त आहे 'धडक'चे बजेट, जान्हवीला मिळाली रिंकूपेक्षा 8 पट जास्त फीस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर 'धडक' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय. आज (20 जुलै) तिचा चित्रपट बॉक्सऑफिसवर दाखल झाला आहे. हा चित्रपटत मराठी चित्रपट 'सैराट'चा रिमेक आहे. 'सैराट' हा मराठीचा ब्लॉकबस्टर चित्रपट आहे. या चित्रपटाने मराठीमध्ये आतापर्यंत सर्वात जास्त कमाई केली आहे. 'धडक' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर जान्हवी आणि ईशानला सोशल मीडियावर कम्पेरिजन रिव्ह्यू मिळत होते. आता 'धडक' चित्रपट 'सैराट'चा रेकॉर्ड मोडू शकेल का हे पाहणं महत्त्वाचा ठरणार आहे. 4 पॉइंटमध्ये जाणून घेऊया 'धडक' आणि 'सैराट'मधील अंतर...


1. बजेट 
हिंदी सिनेमांच्या तुलनेत रिजनल सिनेमा पैशांच्या बाबतीत खुप मागे आहे. मराठी चित्रपट 'सैराट'चे बजेट फक्त 4 कोटी रु. होते. लो बजेट असूनही रिंकूराज गुरु आणि आकाश ठोसरच्या दमदार अॅक्टिंगने चित्रपट हिट झाला होता. तर 'धडक'चे बजेट 25-30 कोटी आहे. यासोबतच चित्रपटच्या जाहिराती आणि मार्केटिंगमध्ये 20 कोटी खर्च झाले आहेत. आता या 50 कोटी बजेट असणा-या चित्रपटाला ऑडियन्सची किती पसंती मिळेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

 

2. लीड स्टार्सची सॅलरी
'सैराट'ची लीड कास्ट रिंकू राजगुरु आणि आकाश ठोसरला चित्रपटासाठी प्रत्येकी 5 लाख मिळाले होते. तर 'धडक' साठी जान्हवीला 40-45 तर शाहिद कपूरचा भाऊ ईशानला या चित्रपटासाठी 60-70 लाख रु. फीस देण्यात आली आहे. 

 

3. ट्रेलर
2016 मध्ये आलेल्या 'सैराट' चित्रपटाच्या ट्रेलरला आतापर्यंत 64 लाख व्ह्यूज मिळाले आहेत. परंतू हा चित्रपट सुपरहिट होता. तर 'धडक'च्या ट्रेलरला 4.57 कोटी व्ह्यूज मिळाले आहेत. 

 

4. बॉक्स ऑफिस कलेक्शन
'सैराट' पहिला असा मराठी सिनेमा आहे ज्याने मराठी इंडस्ट्रीमध्ये 100 कोटींची कमाई केली. हा चित्रपट रिलीज झाल्यानंतर महाराष्ट्रातील थिएटर हाउसफुल राहत होती. पब्लिकच्या मागणीमुळे चित्रपटाचे लेट नाइट शो आणि सकाळच्या शोची टाइमिंग वाढवण्यात आली होती. छोटी शहर आणि गावांतील थिएटरही हाउसफुल होती. 'धडक' चित्रपटाविषयी फिल्म क्रिटिक्स म्हणतात की, श्रीदेवीच्या मुलीमुळे चित्रपटाला प्रेक्षकांचे प्रेम मिळेल. हा चित्रपट 100 कोटींचा आकडा सहज पार करेल असेल बोलले जातेय. जर चित्रपटाने यापेक्षा जास्त कमाई केली तर हा चित्रपट सुपरहिट मानला जाईल. 

बातम्या आणखी आहेत...