आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Forbes : सलमानला मागे टाकत \'खिलाडी\' अक्षय ठरला सर्वाधिक मानधन घेणारा अॅक्टर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


‘फोर्ब्स’ने नुकतीच world’s 100 highest paid entertainers जगातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या सेलिब्रीटींची यादी जाहीर केली आहे. जगभरातील मनोरंजन, संगीत, खेळ यांसारख्या विविध क्षेत्रात प्रसिद्ध असलेल्या 100 सेलिब्रिटीची नावं या यादीत आहेत. या यादीत भारतातील दोन अभिनेत्यांच्या नावांचा समावेश आहे. विशेष म्हणजे शाहरुख आणि आमिरला मागे टाकत बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने या यादीत स्थान पटकावले आहे. जगभरातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या सेलीब्रिटींच्या यादीत अक्षय कुमार 76 व्या स्थानी आहे. अक्षयनंतर या यादीत 82 व्या क्रमांकावर सलमान खानच्या नावाचा समावेश आहे.

 

अनेक सामाजिक प्रश्नांवर आधारित चित्रपटांमध्ये अक्षयने काम केले. चित्रपटाच्या माध्यामातून त्याने हे प्रश्न पुढे नेले आहेत असं कौतुक फोर्ब्सनं केलं आहे. अक्षयचं एकूण उत्पन्न 40.5 मिलिअन डॉलर म्हणजे एकूण अडीच अब्जाहून अधिक असल्याचे फोर्ब्सने म्हटले आहे. तर  सलमानचे चित्रपट हे गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडमधले सर्वाधिक कमाई करणारे चित्रपट म्हणून ओळखले जातात. सलमान म्हणजे चित्रपट 200 कोटीहून अधिकचा गल्ला जमवणार हे समीकरण ठरलेलंच आहे, त्यामुळे या यादीत स्थान मिळवण्यात सलमानही यशस्वी झाला आहे.  सलमानची एकूण कमाई ही 37.7 मिलिअन डॉलर म्हणजे 2 अब्जाहून अधिक असल्याचे म्हटले जाते आहे. 


हे आहेत सर्वाधिक कमाई करणारे टॉप 10 सेलिब्रिटी... 

- या यादीत फ्लाईड मेवेदर अव्वल स्थानी आहे. मेवेदर प्रसिद्ध बॉक्सर आहे. त्याची वार्षिक कमाई 285 मिलियन डॉलर हैं. 
- दुस-या स्थानावर जॉर्ज क्लूनी असून त्यांची कमाई 239 मिलियन डॉलर आहे.
- तिस-या स्थानावर कायली जेनर असून तिची वार्षिक कमाई 166. 5 मिलियन डॉलर आहे. 
- चौथ्या स्थानावर जुडी शेंडलीन असून वार्षिक कमाई 147 मिलियन डॉलर आहे.
- पाचव्या स्थानावर डॉयने जॉनसन असून वार्षिक कमाई 124 मिलियन डॉलर आहे. 
- सहाव्या  स्थानावर यू 2 असून वार्षिक कमाईचा आकडा 118 मिलियन डॉलर आहे. 
- 115. 5 मिलियन डॉलरच्या कमाईसह  कोल्डप्ले सातव्या क्रमांकावर आहे.
- 111 मिलियन डॉलरच्या वार्षिक कमाईसह लिओनेल मेस्सीने आठव्या स्थानावर आहे.
- नवव्या स्थानावर एड शीरन असून त्याची वार्षिक कमाई 110 मिलियन डॉलर आहे.
- दहाव्या स्थानावर क्रिस्टियानो रोनाल्डो असून त्याच्या वार्षिक कमाईचा आकडा 108 मिलियन डॉलर आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...