आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोर्टरुममध्ये बेशुद्ध झाली सलमानची बहीण अलवीरा, बॉडीगार्ड शेराने अशी सांभाळली परिस्थिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/जोधपूर - काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानच्या याचिकेवर आज सुनावणी झाली आहे आणि सलमानला जामीन मंजूर झाला आहे. सकाळी झालेल्या सुनावणीदरम्यान  सलमानची बहीण अलवीरा उपस्थित होती आणि सुनावणीदरम्यान ती अचानक बेशुद्ध पडली. सलमानचा बॉडीगार्ड शेराने यावेळी तिला सांभाळले आणि तिला कोर्टरुमबाहेर घेऊन आला. सलमान खान सध्या जोधपूर जेलमध्ये आहे आणि सलमानला जामीन मिळाल्यानंतर त्याला वापस नेण्यासाठी अर्पिता आणि अलवीरा जोधपूर येथेच आहेत. दोघी बहीणी शुक्रवारी सलमानला भेटायला सेंट्रल जेललाही गेल्या होत्या. पहिल्या दिवसापासून सोबत आहेत बहिणी..

 

- गुरुवारी (5 एप्रिल) रोजी जोधपूर येथे काळवीट शिकार प्रकरणाची सुनावणी झाली आणि त्यात सलमान खानला जामीन मिळाला आहे. 
- यात सलमानला दोषी ठरवल्यानंतर त्याच्या दोन्ही बहिणींना रडू कोसळले.
- सुनावणीदरम्यान प्रत्येक वेळी सलमानसोबत अलवीरा आणि अर्पिता असतात.


पुढच्या स्लाईडवर पाहा, सलमान खानसोबत अर्पिता-अलवीराचे काही खास फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...