आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुर्वी ठरलेला नव्हता सलमान-बॉबीचा शर्टलेस सीन, ऐनवेळी घेतला निर्णय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : सलमान खानचा आगामी चित्रपट 'रेस 3' ईदला म्हणजेच 15 जूनला रिलीज होतोय. चित्रपटाचा ट्रेलर समोर आला आहे. चाहत्यांनी या ट्रेलरला पसंती दिली आहे. अॅक्शनने भरलेल्या या चित्रपटासंबंधीत एक किस्सा समोर आला आहे. वृत्तांनुसार सलमान खान आणि बॉबी देओलचा यामधील शर्टलेस सीन पहिले ठरलेला नव्हता.


डायरेक्टर रेमो डिसूजाने सांगितले कारण...
- सलमान खानचा 'रेस 3' चित्रपट ईदच्या निमित्ताने बॉक्स ऑफिसवर दाखल होणार आहे.
- आपल्या प्रत्येक चित्रपटात शर्टलेस अंदाजात दिसणारा सलमान खान 'रेस 3' मध्येही याच अंदाजात दिसणार आहेत. या चित्रपटात सलमान एकटा नाही तर यावेळी बॉबी दिओल त्याच्यासोबत शर्टलेस दिसणार आहे.
- डायरेक्टर रेमो डिसूनाने एका मुलाखतीत सांगितले की, चित्रपटाचा हा सीन ठरलेला नव्हता. हा सीन करण्याचा निर्णय आम्ही अचानक सेटवर घेतला.
- रेमोने सांगितले की, या चित्रपटासाठी बॉबीने खुप घाम गाळला. आपल्या लूकमध्ये काहीच कमतरता राहू नये यासाठी तो सेटवरही जीम करत होता.
- रेमोने सांगितले की, बॉबीची मेहनत पाहून मी बॉबी आणि सलमानचा शर्टलेस सीन घेण्याचा निर्णय घेतला.
- डायरेक्टर रेमो डिसूजाच्या या चित्रपटात सलमान खान, बॉबी देओल, अनिल कपूर, जॅकलीन फर्नांडिज, डेजी शाह, शाकीब सलीम, फ्रेडी दारुवाला प्रमुख भूमिकेत आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...