आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रात्रभर कतरीनाची वाट पाहात होता सलमान, आल्यानंतरच कापला Birth Day केक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सलमान खानचा आज 52वा वाढदिवस आहे. सलमानने मंगळवारी रात्री त्याच्या पनवेल येथील फार्महाऊसवर बर्थडे सेलिब्रेट केला. यावेळी त्याची एक्स गर्लफ्रेंड कतरीना कैफ आणि टायगर जिंदा हैचे डायरेक्टर अली अब्बास जफरसह काही खास मित्र बर्थडे पार्टीमध्ये दिसले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलमान संपूर्ण रात्र कतरीना कैफची वाट पाहात होता.  ती मध्य रात्री पनवेलला पोहोचली होती. असेही म्हटले जात आहे की कतरीना येईपर्यंत सलमानने केक कटिंग केले नव्हते. 

 

अनुष्काच्या रिसेप्शनमध्ये व्यस्त होती कतरीना... 
- मंगळवारी रात्री मुंबईतील लोअर परळ येथे अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीचे रिसेप्शन होते. कतरीना मंगळवारी रात्री आधी या रिसेप्शनला पोहोचली होती. त्यामुळे सलमानच्या बर्थडे पार्टीला येण्यास तिला उशीर झाला होता. 

 

'टायगर जिंदा है' मुळे कतरीनाची वाट पाहात होता सलमान 
- नुकतीच सलमान खानची 'टायगर जिंदा है' फिल्म रिलीज झाली असून बर्थडे सोबत सलमानला फिल्मचे सक्सेसही सेलिब्रेट करायचे होते. यामुळे तो कतरीनाची वाट पाहात होता. या फिल्ममध्ये कतरीना त्याची को-स्टार आहे. 


- अली अब्बास जफरच्या दिग्दर्शनात तयार झालेली ही फिल्म बॉक्स ऑफिसवर सध्या कमाल करत आहे. पहिल्या चार दिवसांमध्ये फिल्मने 150 कोटींचे कलेक्शन केले आहे. या वर्षी रिलीज झालेल्या 'बाहुबली 2 : द कन्क्लूजन' आणि 'गोलमाल अगेन' सह 'टायगर जिंदा है' या वर्षाची सर्वाधिक कमाई करणारी फिल्म ठरली आहे.

 

अनिल कपूरसह हे सेलेब्स होते पार्टीला... 
- कतरीना कैफ, अली अब्बास जफर याशिवाय अनिल कपूर, प्रोड्यूसर साजिद नाडियादवाला आणि सलमानची सो-कॉल्ड गर्लफ्रेंड यूलिया वंतूरसह काही सेलेब्स या पार्टीला उपस्थित होते. 
- सलमानचा बर्थडे आणि टायगर जिंदा हैचा जश्न बुधवारी सकाळपर्यंत सुरु होता. 

 

बातम्या आणखी आहेत...