आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • सलमान खान, फिल्म रेस 3, Salman Khan Film Race 3 Trailer Launch Event

PHOTOS: \'रेस 3\'च्या ट्रेलर लाँच इव्हेंटमध्ये सलमान बॉबी देओलला म्हणाला, \'बॉडी देओल\'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनिल कपूर, बॉबी देओल, जॅकलिन फर्नांडिस आणि सलमान खान - Divya Marathi
अनिल कपूर, बॉबी देओल, जॅकलिन फर्नांडिस आणि सलमान खान

मुंबईः अभिनेता सलमान खान स्टारर 'रेस 3' या चित्रपटाचा ट्रेलर  लाँच इव्हेंट जुहू येथे झाला. इव्हेंटमध्ये चित्रपटाची स्टारकास्ट उपस्थित होती. सलमान खान, बॉबी देओल,  जॅकलिन फर्नांडिस, डेजी शाह, अनिल कपूर आणि फ्रेडी दारूवाला  यांच्या उपस्थितीत चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला.  विशेष म्हणजे हा ट्रेलर लाँच इव्हेंट सलमानच्या जगभरातील चाहत्यांनी 360 डिग्री फॉर्मेटमध्ये पाहिला.

 

इव्हेंटमध्ये सलमान खान बॉबी देओलविषयी म्हणाला,  'बॉबी देओल आता बॉडी देओल बनला आहे.' याचे उत्तर देताना बॉबीने सलमानचा मामू असा उल्लेख केला आणि पुढे म्हणाला, 'मामू माझ्यासाठी देवदूत आहे. त्याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे.'  इव्हेंटमध्ये जॅकलिन फर्नांडिसने सलमाचे कौतुक करत म्हटले, 'मी सलमान खानची खूप आभारी आहे. किक माझ्या करिअरसाठी एक टर्निंग पाँइंट ठरला.' 


चित्रपटाविषयी सलमान म्हणाला, की वेळ कमी असल्याने मी 'रेस' आणि 'रेस 2' हे दोन्ही चित्रपट बघू शकलो नाही. त्यामुळे 'रेस 3'मध्ये मी माझे इनपुट टाकले आहेत. 'रेस 3' हा चित्रपट यावर्षी ईदच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे. रेमो डिसूजा यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे.


पुढील स्लाईड्सवर बघा, 'रेस 3' चित्रपटाच्या ट्रेलर लाँच इव्हेंटचे फोटोज...  

 

बातम्या आणखी आहेत...