आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुग्णालयातील जनरल वॉर्डात दाखल आहे सलमानची हिरोइन, या सुपरस्टारने केली आर्थिक मदत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेता सलमान खानसोबत ‘वीरगती’ चित्रपटात झळकलेली अभिनेत्री पूजा डडवाल सध्या क्षयरोग आणि फुफ्फसांच्या आजाराशी झुंजत आहे. तिची आर्थिक स्थिती हलाखीची असल्यामुळे तिने सलमान खानकडे आर्थिक मदतीची मागणी केली होती. पूजाच्या मदतीला भोजपूरी स्टार रवी किशन धावून आला आहे. सध्या पूजा मुंबईतील शिवडी येथील टीबी रुग्णालयात  उपचार घेत आहे. 

 

रवी-पूजाने केले होते एकत्र काम... 
- रवी आणि पूजाने दिग्दर्शक विनय लाड यांच्या सिनेमात एकत्र काम केले होते. 
- रवीने या गोष्टीची जाणीव ठेवून तिच्यासाठी  त्याचा साथीदार पप्पू यादव याच्याकडे काही पैसे आणि फळं रुग्णालयात पाठवली. 
- रवी किशनने पूजाला किती रुपयांची मदत केली, याचा खुलासा झालेला नाही.

 

पूजाने सलमानकडे केली होती मदतीची मागणी... 
- पूजाने आर्थिक मदतीसाठी सलमानला साद घातली होती. माध्यमांच्या मदतीने पूजाने

सलमानपर्यंत आपली ही मागणी पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता. 
- ‘6 महिन्यांपूर्वी आपल्याला टीबीची लागण झाल्याचं निदान झालं. तेव्हापासूनच मी मदतीसाठी सलमान खानशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. त्यामुळे आता व्हिडिओच्या माध्यमातून मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकले तर ते माझी मदत करतील अशी आशा आहे, कारण मी गेल्या 15 दिवसांपासून या रुग्णालयात आहे’, असं पूजा म्हणाली होती. 

 

कुटुंबीयांनी फिरवली पूजाकडे पाठ...

- एका मुलाखतीत पूजाने सांगितले, 'मी गेली काही वर्षे गोव्यात कॅसिनो मॅनेज करत होती. माझ्याकडे बिल्कुल पैसे नाहीत. चहा प्यायलादेखील मला दुसऱ्यांवर अवलंबून राहावं लागत आहे.' 

- पूजाचे जवळचे लोक सांगताहेत की तिच्या आजारपणामुळे पती आणि कुटुंबीयांनी तिला एकटीला सोडून दिले.

- योग्य उपचार न झाल्याने तिची प्रकृती दिवसेंदिवस अधिकाधिक बिघडत चालली आहे. 


या चित्रपटांमध्ये झळकली आहे पूजा... 
- पूजाने सलमान खानसोबत 'वीरगती' या चित्रपटात काम केले होते. याशिवाय ती 'सिंदूर की सौगंध' (2002), 'हिंदुस्तान' (2004) 'इंतकाम' आणि 'दबदबा' या चित्रपटांमध्ये झळकली. 


पुढील स्लाईड्सवर बघा, रुग्णालयात दाखल असलेल्या अभिनेत्री पूजा डडवालचे फोटोज...