आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

News: अरबाजच्या सट्टेबाजीमध्ये अडकण्याविषयी पहिल्यांदा बोलला सलमान, सांगितल्या मनातील गोष्टी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : सलमान खान भाऊ अरबाजच्या सट्टेबाजीमध्ये अडकण्याविषयी पहिल्यांदा बोलला. सलमान खानने एका मुलाखती दरम्यान भाऊ अरबाजच्या सट्टेबाजी केसविषयी सांगितले की, "मी ज्या प्रोफेशनमध्ये आहे, त्यामध्ये आपले दुःख दाखवू शकत नाही." सलमान हा एका मॅगझिनसोबत फेम आणि बदनामी या विषयी बोलत होता. यावेळी तो म्हणाला "मी शिकलो आहे की, तुम्ही कोणतीही गोष्ट सहज घेऊ शकत नाही. टॉपवर राहण्यासाठी तुम्हाला लढत राहण्याची गरज आहे. भूतकाळातील घटनांविरोधात तुम्ही लढायला पाहिजे. असे चॅलेंज माझ्या नाही, तर इतर अॅक्टर्स जवळही असतात. सर्वच वाईट प्रसंगातून जातात. अशावेळी तुम्ही चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पुढे यायचे असते. हीरोइन्ससोबत रोमान्स करायचा असतो. तुम्ही टीव्हीवर असाल तर हसावे लागते आणि जोकही मारावे लागतात. दूसरीकडे लोक विचार करतात की, याला काहीच फरक पडत नाही. परंतू त्यांना कळत नाही की, हेच आमचे काम आहे. मग आपण किती टेंशनमध्ये आहोत याचा फरक पडत नाही. आपल्याला परफेक्ट शॉट द्यायचा असतो आणि हसवायचे असते."


सलमानने अरबाजचे उदाहरण देऊन समजावले
- सलमान खानने अरबाज खानच्या सट्टेबाजी केसचे उदाहरण देत आपल्या मनातले समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तो म्हणाला, "जेव्हा अरबाजला आयपीएलमध्ये सट्टेबाजी केसमध्ये समन पाठवण्यात आला तेव्हा मला 'रेस 3'ची प्रेस कॉन्फ्रेंस करावी लागली होती. तुम्ही आपली परिस्थिती सांगू शकत नाही. लोक वेळ काढून तुम्हाला टीव्ही किंवा सोशल मीडियावर पाहण्यासाठी येतात आणि एन्जॉय करतात. चित्रपटाच्या प्रमोशनादरम्यान तुम्ही डिप्रेस्ड दिसू शकत नाही. ही लढाई तुम्हाला लढावीच लागते. वयक्तीक स्थरावर तुम्हाला चढ-उताराचा सामना करु शकता. परंतू ते दाखवू शकत नाही. जर कुणी म्हणाले की, याचा निर्णय येणार आहे आणि हा हसतोय. परंतू हे माझे काम आहे आणि मी ते करतो. माझे कुटूंबीय, मित्र, पाकल कोणत्या परिस्थीतीतून जात आहेत याचा मला काम करताना फरक पडत नाही."

 

अरबाजच्या सट्टेबाजीचा खुलासा असा झाला
- 29 मेला सट्टेबाज सोनू जालानला अटक झाली होती. त्याच्या डायरीमध्ये अरबाजचे नाव सापडले होते. सोनूच्या कॉल रेकॉर्डमध्येही अरबाजसोबत बातचित केल्याचे पुरावे मिळाले होते. यानंतर पोलिसांनी त्याला 600 कोटींच्या सट्टेबाजीच्या प्रकरणी सुरु असलेल्या तपासणीत विचारपूरसाठी बोलावले. यावेळी अरबाज खानने पाच वर्षांपासून आयपीएल सट्टेबाजी करत असल्याचे कबूल केले. तसेच 3 वर्षात जवळपास 2.75 कोटी रुपये हारल्याचे कबूल केले. त्याने सांगितले होते की, मलायकासोबत घटस्फोट होण्यामागे हेच कारण होते. ज्यावेळी अरबाज खान आपला जबाब नोंदवण्यासाठी पोलिस स्टेशनमध्ये पोहोचला तेव्हा सलमानने आपला बॉडीगार्ड शेराला त्याच्यासोबत पाठवले होते.
 

 

 

बातम्या आणखी आहेत...