आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'रेस 3' च्या ट्रेलरमध्ये दिसणार सलमानचा शर्टलेस अवतार, आज होणार रिलीज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : सलमान खानचा मोस्टअवेटेड चित्रपट 'रेस 3' या वर्षी ईदच्या निमित्ताने रिलीज होणार आहे. त्याचे चाहते या चित्रपटाच्या ट्रेलरची आतुरतेने वाट पाहत आहेत. ट्यूबलाइट चित्रपटात सलमानला लाचार अवतारात पाहून त्याचे फॅन्स खुप निराश झाले होते. यानंतर सलमानने ठरवले की, आगामी चित्रपटात तो त्याच्या टिपिकल अंदाजात दिसणार 15 मे रोजी त्याच्या 'रेस 3' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होणार आहे. चित्रपटासंबंधी सूत्रांनी सांगितले की, सलमान या चित्रपटात दिर्घकाळानंतर बेयर बॉडीमध्ये दिसणार आहे. याची एक झलक ट्रेलरमध्येच दिसणार आहे. 


स्लो मोशनमध्ये शर्ट उतरवणार सलमान
- सलमान यापुर्वी 'सुल्तान' चित्रपटात बेयर बॉडीमध्ये कुस्तीच्या रिंगमध्ये दिसला होता. परंतू तो येथे शर्ट काढून त्याच्या टिपिकल अंदाजात दिसला नव्हता. परंतू रेस 3 मध्ये तो खास अंदाजात स्लो मोशनमध्ये शर्ट काढताना उतरवताना दिसणार आहे. पहिले बोलले जात होते की, चित्रपटाचा ट्रेलर इंटरनेटवर रिलीज होऊ शकतो. कारण 14 मे चित्रपटाची टीम जॅसलमेरमध्ये शूटिंग करत होती. परंतू रेमो डिसूजाने स्पष्ट केले आहे की, ट्रेलर एका मोठ्या इव्हेंटमध्ये रिलीज होणार आहे. आणि यावेळी चित्रपटाची संपुर्ण स्टारकास्ट उपस्थित राहणार आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा 'रेस 3' चित्रपटात सलमान आणि जॅकलीन फर्नांडीजचा लूक...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...